त्या हैवानामुळे पीडिता मोजतेय शेवटच्या घटका; डाॅक्टर म्हणाले, तरच वाचू शकेल जीव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

अठ्ठेचाळीस तास महत्त्वाचे असून तिची श्‍वास नलिका जळल्यामुळे तिला श्‍वास घेण्यास त्रास होत असून कृत्रिम श्‍वास यंत्रणेवर ठेवले असल्याची माहिती तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांनी दिली आहे. धोका अजून टळलेला नसून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे उॉक्‍टरांनी सांगितले.

नागपूर - हिंगणघाटमधील जळीत प्राध्यापिकेवर कालपासून नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयामध्ये अती दक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तिला वाचविण्यासाठी डॉक्‍टर शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. तरीही येते अठ्ठेचाळीस तास महत्त्वाचे असून तिची श्‍वास नलिका जळल्यामुळे तिला श्‍वास घेण्यास त्रास होत असून कृत्रिम श्‍वास यंत्रणेवर ठेवले असल्याची माहिती तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांनी दिली आहे. धोका अजून टळलेला नसून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे उॉक्‍टरांनी सांगितले.

सविस्तर वाचा - निघाला होता शाळेत अन रस्त्यात ट्रकखाली सापडला

खर्च सरकार करणार
तिच्यावर प्लॅस्टिक सर्जरी करावी लागणार असून तिच्यावरील उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याचे कॉंग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांनी सांगितले आहे. आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून या घटनेमागील सत्य अजून उलगडलेले नाही. पुढील तपास सुरू आहे.
पीडितेचा चेहरा पूर्ण भाजला असून डोळे आणि वाचाही गेल्याचा संशय डॉक्‍टरांना आहे.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 48 hours are important for her life