
गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात पाऊस सरासरी गाठत आहे. त्याचा थेट परिणाम गतवर्षीही रब्बी पेरणीवर झाला होता. यंदाही पावसाने जिल्ह्यात जवळपास सरासरी पार केली आहे. सोबतच अतिवृष्टी व त्यामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे जमिनीत ओलावा कायम आहे. त्याचा फायदा रब्बी पिकांना होणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येते.
नागपूर : अतिवृष्टी व पूरपरिस्थीतीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परंतु, हा पूर रब्बी हंगामासाठी पोषक ठरत आहे. त्यामुळेच जिल्ह्यात यंदा रब्बी पिकांच्या लागवड क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागाचा आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६० टक्के क्षेत्रात रब्बी पिकांची पेरणी पूर्ण झाल्याचे सांगण्यात येते.
हेही वाचा - चांदूर बाजार नगरपालिकेची पोटनिवडणूक, भाजपचा पराभव करत...
गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात पाऊस सरासरी गाठत आहे. त्याचा थेट परिणाम गतवर्षीही रब्बी पेरणीवर झाला होता. यंदाही पावसाने जिल्ह्यात जवळपास सरासरी पार केली आहे. सोबतच अतिवृष्टी व त्यामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे जमिनीत ओलावा कायम आहे. त्याचा फायदा रब्बी पिकांना होणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येते. जिल्ह्यात रब्बी हंगामामध्ये गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, मका, मिरची, भाजीपाला आदी प्रमुख पिके घेतली जातात. रब्बीचे जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्र हे १ लाख ७३ हजार ५४७ हेक्टर इतके आहे.
हेही वाचा - मध्य प्रदेशातून आंध्रात होतेय पशुधन तस्करी; कारवाईत पोलिस दिरंगाई करत असल्याचा आरोप
गतवर्षी जिल्ह्यात रब्बीमध्ये कृषी विभागाने १.५५ लाख नियोजित क्षेत्र होते. त्यापैकी १ लाख ५८ हजारावर प्रत्यक्ष पेरणी झाली होती. यंदा कृषी विभागाने रब्बीसाठी सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा ३ हजार ६५३ हेक्टर अधिकचे म्हणजेच १ लाख ७७ हजार २०० हेक्टरचे एकूण नियोजन केले आहे. यंदा रब्बी हंगामामध्ये गव्हाचे ८५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. हरभऱ्याचे ८६ हजार हेक्टरवर लागवड क्षेत्र राहणार असून, त्याखालोखाल रब्बी ज्वारी, मका आदींचा समावेश आहे. गव्हाच्या तुलनेत हरभऱ्याचा पेरा वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.