कन्हानमध्ये नगरपरिषदेसाठी 62.59 टक्‍के मतदान 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

गुरुवारी झालेल्या निवडणुकीकरिता भाजप, कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, प्रहार व अन्य पक्षांतील उमेदवारांना तारेवरची कसरत करावी लागली. गुरुवारी सायंकाळी उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएमबंद झाले.

कन्हान (जि.नागपूर ) : कन्हान नगर परिषदेची निवडणूक कडक पोलिस बंदोबस्तात व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत शांततेत पार पडली. यात एकूण 62.59 टक्‍के मतदान झाले. पुरुष मतदार 63.38 टक्‍के तर महिला मतदारांनी 61.70 टक्‍के मतदानाचा हक्क बजावला. 

क्‍लिक करा: नागपूर जिल्हा परिषद: 21 व्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळयात? 

उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम बंद; मतमोजणी आज 
गुरुवारी झालेल्या निवडणुकीकरिता भाजप, कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, प्रहार व अन्य पक्षांतील उमेदवारांना तारेवरची कसरत करावी लागली. गुरुवारी सायंकाळी उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएमबंद झाले. मतगणना शुक्रवारी सकाळी आठला निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सवरंगपते, रोहिणी पाठरावे, सहायक निवडणूक अधिकारी सतीश गावंडे यांच्या उपस्थितीत कन्हान नगर परिषद कार्यालयात होईल. 
नगर परिषद कन्हान पिपरीच्या सार्वत्रिक निवडणुकीत जनतेतून नगराध्यक्षा व 8 प्रभागातून 17 नगरसेवकांकरिता ही निवडणूक झाली. यात धर्मराज विद्यालय, सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक शाळा, भारतरत्न इंदिरा गांधी महाविद्यालय, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिहोरा, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिपरी, बळीराम दखने हायस्कूल, जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा कन्हान, बिहरीलाल खंडेलवाल कॉम्पेसिव्ह कन्हान आदी 30 मतदानकेंद्रांवर निवडणूक मतदान शांततेत पार पडले. नगर परिषदच्या निवडणुकीस कुठेच गालबोट लागू नये म्हणून पोलिस निरीक्षक चंद्रकांत काळे यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. 

क्‍लिक करा:  खिल्ला-या बैलाची जोडी गेली चक्‍क न्यायालयात 

कळमेश्वर-ब्राह्मणीत 61.1 टक्‍के मतदान 
कळमेश्वर ः नगरपरिषदेच्या ब्राह्मणी येथील एका जागेसाठी गुरुवारी मतदान शांततेत पार पडले. या निवडणुकीत मतदानाची टक्‍केवारी 61.01 इतकी ठरली. 
निवडणुकीकरिता कॉंग्रेसच्या वतीने आशीष एकनाथ कुकडे, भाजपचे वतीने सुनील वसंतराव चुनारकर, अपक्ष मुकेश चंद्रसिंग भरके असे 3 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 9,721 मतदारांपैकी 5,931 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 2,691 स्त्री मतदार तर 3,240 पुरुष मतदारांचा समावेश होता. शुक्रवारी सकाळी दहाला नगर परिषद हायस्कूलच्या सभागृहात मतमोजणी पार पडणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 62.59 per cent voting for municipal council in Kanhan