esakal | मध्यवर्ती कारागृहात पुन्हा कोरोनाचा कहर, फाशीच्या ३ कैद्यांसह ८ जण पॉझिटिव्ह

बोलून बातमी शोधा

8 people found corona positive in central jail nagpur

सहा महिन्यांपूर्वी मध्यवर्ती कारागृहात अनेक कैद्यांना कोरोना झाला होता. तसेच जवळपास ५० टक्के कर्मचारीही बाधित झाले होते. जेल अधीक्षक अनुप कुमरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी एका कैद्याची प्रकृती बिघडली होती.

मध्यवर्ती कारागृहात पुन्हा कोरोनाचा कहर, फाशीच्या ३ कैद्यांसह ८ जण पॉझिटिव्ह
sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. फाशीची शिक्षा झालेल्या तीन कैद्यांसह आठ कैद्यांना कोरोना झाला आहे. एक जेलरक्षकसुद्धा बाधित झाला आहे. बाधित कैद्यांना रविवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा - सोयाबीनची वाटचाल सात हजारांकडे; लाभ मात्र व्यापाऱ्यांनाच, शेतकऱ्यांचे खिसे रिकामेच

सहा महिन्यांपूर्वी मध्यवर्ती कारागृहात अनेक कैद्यांना कोरोना झाला होता. तसेच जवळपास ५० टक्के कर्मचारीही बाधित झाले होते. जेल अधीक्षक अनुप कुमरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी एका कैद्याची प्रकृती बिघडली होती. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी आणखी सात कैद्यांची प्रकृती खराब झाल्याचे समोर आले. त्यामुळे कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये ७ कैदी आणि एक जेल कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले. सर्वांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या सर्व बाधितांची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे कैद्यांना पुन्हा कारागृहातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाधितांमध्ये फाशीचे तीन कैदी, एक मोक्काचा कैदी, एक एमपीडीए (स्थानबद्ध) तसेच तीन अंडर ट्रायल (शिक्षाधीन) कैद्यांचा समावेश आहे.

हेही वाचा - हृदयद्रावक! शेतात काम करताना महिलांना अचानक दिसला तार...

तरीही झाला कोरोना -
फाशीची शिक्षा झालेल्या कैद्यांना बरॅकच्या बाहेर सोडण्यात येत नाही. त्यांना कुठेही फिरू दिले जात नाही. ते चोवीस तास बंदिस्त असतात. तरीही फाशीच्या कैद्यांना कोरोना झाला, हे आश्‍चर्यकारक आहे. सिव्हिल सर्जन आणि आरोग्य विभागाच्या पथकाची जिल्हाधिकाऱ्यांना मागणी करण्यात आल्याची माहिती कुमरे यांनी दिली.