
शासकीय दंत महाविद्यालयात कोरोनाचा विळखा कायम असून येथील आणखी १० जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यात विद्यार्थी, कर्मचाऱ्यांसह इतरांचाही समावेश आहे. त्यामुळे येथील बाधितांची संख्या २३ च्या वर गेली आहे.
नागपूर : कोरोना योद्ध्यांचे लसीकरण सुरू आहे. काहींना दुसरा डोस देण्यात आला, तर काहींनी पहिला डोस घेतल्यानंतर काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. मात्र, कोविड प्रतिबंधक लसीचा डोस घेतलेल्या ८ कोविड योद्ध्यांना कोरोना झाला असल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. लस घेतल्यानंतरही कोरोना कसा झाला? यावर तर्क वितर्क सुरू झाले आहेत.
हेही वाचा - यवतमाळमध्ये पूजा अरुण राठोडचा गर्भपात; डॉक्टर आठ दिवसांपासून गायब ?
शासकीय दंत महाविद्यालयात कोरोनाचा विळखा कायम असून येथील आणखी १० जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यात विद्यार्थी, कर्मचाऱ्यांसह इतरांचाही समावेश आहे. त्यामुळे येथील बाधितांची संख्या २३ च्या वर गेली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम सुरू आहे. त्यातच गेल्या आठ दिवसांच्या कालावधीत लस घेतल्यावरही सुमारे ८ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना झाला आहे. यापैकी २ डॉक्टर शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील आहेत. तर २ डॉक्टर महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयातील आहेत. याशिवाय इतर आरोग्य कर्मचारी मेडिकल, मेयोतील आहेत.
हेही वाचा - लग्नासाठी वर-वधू होते तयार; मंगलाष्टक सुरू असतानाच झाले सर्वकाही शांत; वधूपक्षावर ओढवली नामुष्की
लसीकरणाचा दुसरा डोस दिल्याच्या १४ दिवसानंतरच लसीचे परिणाम समजू शकत असल्याचं कंपनीसह संशोधकांनीही म्हटलं आहे. लस घेतल्यानंतरही मास्क, अंतर व इतर खबरदारी घेणे आवश्यक आहे. लसीचे दोन डोस घेणाऱ्या व्यक्तींसाठीच ती प्रभावी ठरते.
-डॉ. मंगेश फडनाईक, अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर.