नागपुरात तब्बल ९८ हजार रुग्ण झाले कोरोनामुक्त; आज नवे २७२ रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू 

राजेश प्रायकर    
Sunday, 8 November 2020

गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधित तसेच बळींच्या संख्येत कमालीची घट झाल्याने सुखालेल्या आरोग्य यंत्रणेत बाधित आणि बळींचा आलेख सतत कमी अधिक होत असल्याने धडकी भरली आहे.

नागपूर ः दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात चैतन्य असून, कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ९८ हजारांवर पोहोचल्याने आशादायक चित्र निर्माण झाले आहे. रविवारी ३३१ बाधित कोरोनामुक्त झाले. बाधितांच्या संख्येचा आलेख दररोज कमी अधिक होत आहे. काल १५९ बाधित आढळून आले होते, आज रविवारी २७२ नवे बाधित आढळून आले. ग्रामीण भागात एकही कोरोनाबळी नसून शहरातील सहा जण दगावले.

गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधित तसेच बळींच्या संख्येत कमालीची घट झाल्याने सुखालेल्या आरोग्य यंत्रणेत बाधित आणि बळींचा आलेख सतत कमी अधिक होत असल्याने धडकी भरली आहे. त्यातच दिवाळीत खरेदीसाठी आज मोठ्या प्रमाणावर झालेल्या गर्दीने प्रशासन कोरोना संक्रमणावरून चिंता व्यक्त करीत आहे. मात्र, रविवारी कोरोनामुक्त झालेल्या बाधितांची संख्या ९८ हजार १३७ पर्यंत पोहोचल्याने थोडे फार समाधानही आहे. यात ग्रामीण भागातील २० हजार २२१ तर शहरातील ७७ हजार ९१६ जणांचा समावेश आहे.

जाणून घ्या - Success story : सोशल मीडियावर स्क्रोलिंग करताना सापडला उद्योगाचा मार्ग, आता महिन्याला कमावतोय लाखो रुपये

एकूणच आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर आरोग्य यंत्रणा झुलत आहे. आज ३३१ जण कोरोनामुक्त झाले. त्याचवेळी २ हजार ४३९ चाचण्यांच्या आलेल्या अहवालातून २७२ नवे बाधित आढळून आले. यात ११४ ग्रामीण भागातील तर १५८ शहरातील आहेत. बाधितांची एकूण संख्या १ लाख ४ हजार ९४० पर्यंत पोहोचली. 

रविवारी केवळ शहरात सहा मृत्यूची नोंद करण्यात आली. ग्रामीण भागात कोरोनाचा एकही बळी आढळून आला नाही. शहरातील सहा मृत्यूसह एकूण कोरोनाबळींची संख्या ३ हजार ४७० पर्यंत पोहोचली. एकूण कोरोनाबळींमध्ये ग्रामीण भागातील ५८० जणांचा समावेश असून, शहरातील २ हजार ४५४ जण आहेत. ४३६ मृत्यू जिल्ह्याबाहेरील आहेत.

क्लिक करा- आमदार होईल म्हटल्यावर लोकांनी टिंगलटवाळी केली अन् आता शिक्कामोर्तब होताच त्यांनाच आलं भरून 

उपचार घेणाऱ्या बाधितांच्या संख्येत घट

जिल्ह्यात आता ३ हजार ३३३ बाधित उपचार घेत आहेत. कालपर्यंत उपचार घेणाऱ्यांची संख्या ३ हजार ३९८ होती. आज यात घट नोंदविण्यात आली. सद्यःस्थितीत ग्रामीण भागात ८४१ तर शहरात २ हजार ५५७ जणांवर उपचार सुरू आहेत. २ हजार २८९ बाधित घरीच उपचार घेत आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 98 percent people get discharged after corona in nagpur