'आदर्श' शिक्षकांवर अद्याप कारवाई नाही; फाईल शिक्षण विभागातच पडून, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

नीलेश डोये
Sunday, 18 October 2020

यासाठी राजकीय दबावाचा वापर झाला. परंतु सीईओ या दबावाला बडी पडले नसल्याचे सांगण्यात येते. फाईल सीईओंकडे गेली असल्याचे विभाग एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. आता सीईओ काय निर्णय घेतात, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

नागपूर : विभागीय चौकशी सुरू असलेल्या शिक्षकाची आदर्श पुरस्कार निवड केल्याप्रकरणी एक महिना झाल्यावरही अद्याप दोषींवर कुठल्याच प्रकारची कारवाई झाली नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कारवाईची फाईल शिक्षण विभागातच पडून आहे. प्रकरण दडपण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाकडून होत असल्याची चर्चा आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्पष्टीकरण आल्यानंतर साधारणतः आठ दिवसात फाईल सीईओंकडे जायला पाहिजे. परंतु तसे झाले नाही. सीईओ कारवाईबाबत अंतिम निर्णय घेतील. हे प्रकरण दडविण्याचे प्रयत्न झाले.

क्लिक करा - आता लायसन्ससाठी कुठेही जायची गरज नाही; घरबसल्या पुढील पद्धतीने काढा लर्निंग लायसन्स

यासाठी राजकीय दबावाचा वापर झाला. परंतु सीईओ या दबावाला बडी पडले नसल्याचे सांगण्यात येते. फाईल सीईओंकडे गेली असल्याचे विभाग एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. आता सीईओ काय निर्णय घेतात, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

दोषींवर कारवाई करा
हा एक प्रकारचा घोटाळाच आहे. यात आर्थिक व्यवहार झाल्याचे सांगण्यात येते. यातील दोषींवर कारवाई झाली पाहिजे.
- अनिल निधान,
विरोधी पक्ष नेते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aadarsh teacher file is in the education department