मतभेद बाजूला ठेवून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व आरपीआयचे नेते आले एकत्र; अभिजित वंजारी यांची सभा
नागपूर : विधानपरिषद पदवीधर मतदार संघासाठीचे महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. अभिजित वंजारी यांच्यासाठी महाआघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना तसेच आरपीआयचे नेते एकत्र आले आहेत. नेते आपसातील मतभेद बाजूला ठेवून प्रचारात सहभागी होत असल्याने यावेळी इतिहास घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, पिरिपा (कवाडे गट), आरपींआय ( गवई गट) आणि मित्र पक्षाच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजित वंजारी यांच्या प्रचारसभांना नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत व आमदार विकास ठाकरे यांचा उपस्थिती होती.
सभेस प्रामुख्याने नितीश ग्वालवंशी, रश्मी उइके, ओवस कादरी, देवेंद्र रोटोले, प्रमोद ठाकूर, प्रो. नेताम, प्रो. रत्नदीप गणवीर, शशिकांत जांभूळकर, विजय मेश्राम, किशोर नेताम, मोईन सिद्दीकी, कुलदीप सोनकुसरे, डॉ. कैलाश सहारे होते.
गांधीसागर उद्यानात सकाळी दिवाळी मिलन कार्यक्रमाच्या निमित्ताने वंजारी यांनी सभा घेतली. यावेळी राजेश कुंभलकर उपस्थित होते. त्यानंतर वर्धेत व त्यानंतर दक्षिण पश्चिम कॉंग्रेस कमिटीची अनसुया मंगल कार्यालय, मंगलमूर्ती चौक येथे सभा झाली. देवडीया कॉंग्रेस भवन येथे झालेल्या सभेला बंटी शेळके उपस्थित होते.
अतुल कोटेचा, कमलेश समर्थ, डॉ. सलीम चव्हाण, चंद्रकांत हिंगे, जुल्फीकार अहमद भुट्टो, डॉ. विठ्ठलराव कोंबाडे, अशोक निखाडे, तौसी फरवान, गोपाल पट्टम, मनीष उमरेडकर, अभय घाटोळे,अक्षय घाटोळे, नईमखान इत्यादींची उपस्थिती होती.
समाजकार्य कल्याण मंडळाचा पाठिंबा
अभिजित वंजारी यांना समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ, महाराष्ट्र जिल्हा नागपूरतर्फे पाठिंबा जाहीर केला आहे. समाजकार्य पदवीधरांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, समाजकार्य पदवीधरांच्या शासनातील हक्कांच्या जागा मिळवून द्याव्या यासाठी हे समर्थ देण्यात आल्याचे मंडळाचे जिल्हाध्यक्ष अंकित राऊत यांनी म्हटले आहे.
संपादन - नीलेश डाखोरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.