ट्यूबलाइटच्या स्फोटामुळे असंख्य जखमा...तरीही वाचला जीव, वाचा नेमके काय झाले!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

या स्फोटात सत्तेचाळीस वर्षीय दीक्षा बोंडे गंभीर जखमी झाल्या. ट्यूबलाइटच्या काचेमुळे त्यांच्या शरीरावर बऱ्याच जखमा झाल्या. गरम काचांमुळे अंगाची लाहीलाही होत होती. धाप लागत होती. रक्तदाब कमी झाला होता. अत्यवस्थ स्थितीत त्यांना सीताबर्डी येथील लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तीन दिवस अतिदक्षता विभागात त्यांच्यावर झालेल्या उपचारामुळे त्यांचा जीव वाचला.

नागपूर : घरी लग्न असल्याने साफसफाई सुरू होती. जुन्या कपड्यांसह कचरा अंगणात काढला. कपड्यांसह ट्यूबलाइटही जाळले,ु ट्यूबलाइटचा प्रचंड स्फोट झाला. या स्फोटात सत्तेचाळीस वर्षीय दीक्षा बोंडे गंभीर जखमी झाल्या. ट्यूबलाइटच्या काचेमुळे त्यांच्या शरीरावर बऱ्याच जखमा झाल्या. गरम काचांमुळे अंगाची लाहीलाही होत होती. धाप लागत होती. रक्तदाब कमी झाला होता. अत्यवस्थ स्थितीत त्यांना सीताबर्डी येथील लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तीन दिवस अतिदक्षता विभागात त्यांच्यावर झालेल्या उपचारामुळे त्यांचा जीव वाचला.
दोन फेब्रुवारीला सकाळी ही घटना घडली. मध्य भारतातील ही पहिलीच विदारक घटना असल्याचे सांगितले जाते. दीक्षा याबोंडे चिखला (मॉइल) येथील रहिवासी आहेत.

सविस्तर वाचा - डॉन आंबेकरचे पैसे प्रॉपर्टीत गुंतवणार कोण? वाचा काय झाले
वरिष्ठ शल्यचिकित्सक डॉ. नरेंद्र चोपडे यांनी रुग्णाला कॅज्युअल्टीमध्ये पाहिले. रुग्णाची अवस्था खूपच खालावलेली दिसली. श्‍वास घेता येत नव्हता. रक्‍तदाब कमी होऊन त्या बेशुद्ध पडल्या होत्या. डॉ. चोपडे यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू केले. उपचारादरम्यान त्या वारंवार बेशुद्धावस्थेत जात होत्या. अथक प्रयत्नानंतर त्यांना शुद्ध आली.

168 जागी रुतल्या काचा
रुग्णाची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या शरीरात सुमारे 168 जागी काचेचे तुकडे रुतले होते. डॉक्‍टरांनी यशस्वीरीत्या सूक्ष्म काच बाहेर काढले. लता मंगेशकर हॉस्पिटलमधील सर्जरी विभागातील वैद्यकीय पथकाच्या अथक प्रयत्नातून बोंडे यांचा जीव वाचविण्यात यश आले. शल्यचिकित्सक डॉ. नरेंद्र चोपडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्ष देशमुख, डॉ. अफजल शेख, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. सोनाली खन्ना, बधिरीकरणतज्ज्ञ डॉ. प्राजक्ता बिजवे यांनी ही कामगिरी पार पाडली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An accident due to Tubelight blast