चार वर्षांत निम्म्याच शेतकऱ्यांना अपघात विम्याचा लाभ; प्रलंबित प्रकरणांची यादी मोठी

नीलेश डोये
Tuesday, 1 December 2020

विम्याचा लाभ मिळविण्यासाठी शेतकरी १० ते ७५ या वयोगटातील सात-बाराधारक असणे आवश्यक आहे. अपघाताचा प्रसंग घडल्यास शेतकरी किंवा त्याच्या वारसदारास तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा लागतो. गेल्या चार वर्षांत ५१ टक्केच शेतकऱ्यांच विम्याचा लाभ देण्यात आला. 

नागपूर : शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शासनातर्फे दोन लाखांपर्यंतचे अर्थसाहाय्य देण्यात येते. नागपूर जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत अर्जाच्या पन्नास टक्केच शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला. अर्ज नाकारण्यासोबत प्रलंबित अर्जांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे.

राज्यात शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघातामुळे मृत्यू झाल्यास कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशावेळी अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्याच्या कुटुंबास अर्थसाहाय्य देण्यासाठी चार वर्षांपूर्वी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली.

हेही वाचा - बाबांचे समाधीस्थळ असलेल्या स्मृतीवनात डॉ. शीतल आमटेंचा दफनविधी, रात्री उशिरा होणार अंत्यसंस्कार

अपघाती मृत्यू किंवा अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी होणे यासाठी दोन लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. तर अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी होणे यासाठी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. अपघात होणाऱ्या शेतकऱ्यांचा विमा प्रस्ताव विमा कालावधीत तसेच विमा कालावधी संपल्यानंतरही ९० दिवसांपर्यंत केव्हाही विमा कंपनीकडे सादर करता येते.

विम्याचा लाभ मिळविण्यासाठी शेतकरी १० ते ७५ या वयोगटातील सात-बाराधारक असणे आवश्यक आहे. अपघाताचा प्रसंग घडल्यास शेतकरी किंवा त्याच्या वारसदारास तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा लागतो. गेल्या चार वर्षांत ५१ टक्केच शेतकऱ्यांच विम्याचा लाभ देण्यात आला.

सविस्तर वाचा - शेतजमिनीला मोल येताच नात्यात कटुता, एक स्वाक्षरी लाखोंची

एकूण प्रस्ताव - ३५९
मंजूर दावे - १८५
नामंजूर दावे - ८२

प्रलंबित दावे - ९२

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident insurance benefits to half of farmers in four years