
फेब्रुवारीत रघुवंशी हे सेवानिवृत्त होणार होते. निवृत्त होताच मुलींच्या लग्नाची तयारी ते करणार होते. रघुवंशी यांचे उत्कृष्ट कार्य पाहता २००८ मध्ये पोलिस महासंचालक पदकांनी सन्मानित करण्यात आले होते.
नागपूर : गणराज्य दिनाच्या पथसंचलनासाठी जात असताना औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानाला दुचाकीने धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जी. डी. रघुवंशी (वय ५९, रा. एअरपोर्ट कॉलनी) असे मृत पावलेल्या जवानाचे नाव आहे.
रघुवंशी हे सीआयएसएफमध्ये हवालदार पदावर कार्यरत होते तसेच ते जवानांना योगाचे प्रशिक्षण देत होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त सीआयएसएफचे पथसंचलन होते. मंगळवारी सकाळी ते दुचाकीने रवाना झाले होते. घरापासून काही अंतरावर गेल्यानंतर त्यांना एका दूधविक्रेत्याच्या दुचाकीने धडक दिली. ते गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी तीन वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
अधिक माहितीसाठी - वाढदिवसाला नातेवाईक बसले जेवायला; बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन
याची माहिती मिळताच पत्नी गौरी, मुलगी नेहा आणि निधी यांना मोठा धक्का बसला. गौरी या गृहिणी आहेत तर नेहा ही डॉक्टर असून निधी वैद्यकीय शिक्षण घेत आहे. येत्या फेब्रुवारीत रघुवंशी हे सेवानिवृत्त होणार होते. निवृत्त होताच मुलींच्या लग्नाची तयारी ते करणार होते. रघुवंशी यांचे उत्कृष्ट कार्य पाहता २००८ मध्ये पोलिस महासंचालक पदकांनी सन्मानित करण्यात आले होते. बुधवारी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अमरावती बायपास रोडवर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीने दुसऱ्या दुचाकीला धडक दिली. या विचित्र अपघातात एक महिला ठार झाली तर मुलगी आणि दिर गंभीर जखमी झाले. विनिता बानकर (४६, रा. बुटीबोरी) असे मृत महिलेचे नाव आहे. मंगळवारी दुपारी तीन वाजता गणेश बानकर हे वहिणी विनिता आणि पुतणी अंकिता (२०) यांच्यासह दुचाकीने वडधामनाकडून वानाडोंगरीकडे जात होते. बायपासजवळ ट्रकला ओव्हरटेक करणाऱ्या दुचाकीने तिघांना धडक दिली. या धडकेत विनिताचा मृत्यू झाला. दोघे जखमी झाले.