आणखी कितीदा जाळणार आम्हाला? पुन्हा पाच महिलांवर ऍसिड हल्ला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

माथेफिरू नीलेशच्या ऍसिड हल्ल्यात किरकोळ जखमी झालेल्या डॉ. सोफी सायमा या नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेयो) सहायक व्याख्याता या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वातील डॉक्‍टरांचे एक पथक आज नॅकोच्या (नॅशनल एड्‌स कंट्रोल ऑर्गनायजेशन) सर्वेक्षणासाठी सावनेर येथे आल्या होत्या. त्यांच्यासोबत डॉ. शुभ्रा जोशी आणि डॉ. सुकन्या कांबळे याही होत्या. पहेलेपार या झोपडपट्टी भागात घरोघरी जाऊन सर्वेक्षणासाठी त्या माहिती घेत होत्या.

सावनेर (जि. नागपूर) : हिंगणघाट येथे प्राध्यापिकेवर पेट्रोल ओतून पेटता टेंभा फेकण्याची घटना ताजी असताना नागपूर जिल्ह्यातील सावनेरच्या पहेलेपार भागात महिला डॉक्‍टरांवर ऍसिड फेकण्याची खळबळजनक घटना गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. अचानक झालेल्या या हल्ल्यातून वाचण्याचा डॉक्‍टरांनी प्रयत्न केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. ऍसिडचे काही थेंब उडाल्यामुळे तीन जणी जखमी झाल्या आहेत. तर झटापटीत आरोपीच्या चेहऱ्यावरही ऍसिडचे काही थेंब उडाले. आरोपी नीलेश कन्हेरे (वय 24) याने कुठल्या कारणासाठी ऍसिड फेकले हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. 

माथेफिरू नीलेशच्या ऍसिड हल्ल्यात किरकोळ जखमी झालेल्या डॉ. सोफी सायमा या नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेयो) सहायक व्याख्याता या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वातील डॉक्‍टरांचे एक पथक आज नॅकोच्या (नॅशनल एड्‌स कंट्रोल ऑर्गनायजेशन) सर्वेक्षणासाठी सावनेर येथे आल्या होत्या. त्यांच्यासोबत डॉ. शुभ्रा जोशी आणि डॉ. सुकन्या कांबळे याही होत्या. पहेलेपार या झोपडपट्टी भागात घरोघरी जाऊन सर्वेक्षणासाठी त्या माहिती घेत होत्या.

प्रियकराचा जीव वाचविण्यासाठी प्रेयसीने फोडला हंबरडा... पण

महिला डॉक्‍टरांसह पाच जणींवर ऍसिड फेकले 
यावेळी त्यांच्यासोबत परिसरातच राहणाऱ्या गौरी सोनेकर आणि सुरेखा बंडे या बारा वर्षांच्या मुलीही होत्या. त्यांचे काम सुरू असताना अचानक आलेल्या आरोपी नीलेश कन्हेरे याने त्यांच्या दिशेने ऍसिड फेकले. परंतु, या डॉक्‍टरांनी बचावाचा प्रयत्न करून आरडाओरड केली. यावेळी झालेल्या झटापटीत डॉ. सोफी सायमा यांच्यासह गौरी सोनेकर आणि सुरेखा बंडे या मुलींवर ऍसिडचे काही थेंब उडाले. 
सावनेरमध्ये खळबळ, तिघी जखमी, आरोपीला अटक 

आरोपीच्या चेहऱ्यावरही ऍसिडचे काही थेंब उडाल्याची माहिती आहे. आरडाओरड ऐकून घटनास्थळी आलेल्या नागरिकांनी आरोपीला ताब्यात घेऊन चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. संतप्त नागरिकांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी रेटून धरत पोलिस ठाण्याच्या आवारात गोंधळ घातला. 
या हल्ल्यात डॉ. सोफी यांच्यासोबत असलेल्या डॉ. शुभ्रा जोशी आणि डॉ. सुकन्या कांबळे थोडक्‍यात बचावल्या. सर्व जखमींना उपचारासाठी नागपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

वनगुन्हेगारांना आता ताडोबात प्रवेश बंदी!

या हल्ल्यात गौरीच्या गळ्यावर ऍसिडचे थेंब उडाले असून आरोपीचा चेहरा खराब झाल्याची माहिती आहे. घडलेला प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी नीलेशला पकडून बदडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. शिवाय नागरिकांनी पोलिस ठाण्याच्या आवारात गर्दी केली होती. नागरिकांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती. याप्रकरणी सावनेर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: acid attack on five girls including women doctor nagpur