शिक्षकांनो व्हा सावधान ! दहा शिक्षकांवर झाली "ही' कारवाई, काय गुन्हा होता "त्यांचा', वाचा...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जून 2020

वाडी पोलिसांनी आपत्ती कायद्यांतर्गत विशाखा सुभाष चानेकर, पल्लवी बंड, अशोक डोंगरकर, युवराज उमरेडकर, किशोर गळमाळे, हफिजा बेगम शेख, किशोर वानोडे, ज्योती पुरके, रजनी गोंगले, पंकज बांते या 10 शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल केला.

वाडी (जि.नागपूर) : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व योग्य कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्ह्यात घरोघरी सर्वेक्षणांतर्गत "हाय रिस्क' रुग्ण शोधणे व सर्वेक्षणाच्या कामासाठी शिक्षकांची सेवा घेऊन काम पूर्ण करण्यात आले. यासाठी खासगी व जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना हजर राहणे बंधनकारक करण्यात आले होते. परंतू या शिक्षकांनी या कामात टाळाटाळ केल्याप्रकरणी नगरपरिषदेने त्यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

आणखी वाचा : लॉकडाउन शिथिल करणे नागपुरला पडले महागात, वाचा सविस्तर

आदेश मिळाल्यानंतरही होते गैरहजर
सर्वेक्षणाचे काम 29 एप्रिलपासून 2 जूनपर्यंत पूर्ण करण्यात आले. परंतु या शासकीय व अकस्मात आपत्ती कामासाठी आदेश मिळाल्यानंतरही शिक्षकांनी गैरहजर राहून शासकीय
आदेश व कायद्याचे उल्लंघन केले. अशा 10 शिक्षकांविरोधात कठोर भूमिका स्वीकारून वाडी नगरपरिषद प्रशासनाने 17 जूनला वाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे वृत्त शिक्षण क्षेत्रात येताच खळबळ उडाली. वाडी पोलिसांनी आपत्ती कायद्यांतर्गत विशाखा सुभाष चानेकर, पल्लवी बंड, अशोक डोंगरकर, युवराज उमरेडकर, किशोर गळमाळे, हफिजा बेगम शेख, किशोर वानोडे, ज्योती पुरके, रजनी गोंगले, पंकज बांते या 10 शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल केला.

हेही वाचा : "मुंबई रिटर्न' वृद्‌धाचा अहवाल मिळाला पॉजिटिव्ह, पण मृत्यू झाल्यानंतर, मग घडले असे...

अन्‌ कारणही सादर केले नाही
नगरपरिषदेचे कर्मचारी संदीप अढाऊ यांनी लेखी तक्रारीत सांगितले की, हे महत्त्वपूर्ण काम करण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार जवळपास सर्व शिक्षकांना मुख्याध्यापक, व्हॉट्‌सऍप, मोबाईल आदींच्या माध्यमातून कर्तव्यासाठी उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली. परंतु हे शिक्षक हजरही राहिले नाही व गैरहजर राहण्याचे एकही योग्य कारण प्रशासनाकडे सादर केले नाही. शेवटी मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी या शिक्षकांवर कायदेशीर कारवाई केली. वाडी नगरपरिषदेच्या स्थापनेनंतर अशी कठोर कारवाई पहिल्यांदा दिसून आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action taken against ten teachers