"मुंबई रिटर्न' वृद्‌धाचा अहवाल मिळाला पॉझिटिव्ह, पण मृत्यू झाल्यानंतर, मग घडले असे...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जून 2020

संताजी नगर प्रभाग 5 येथील गाड्यांच्या बॅटरी दुरुस्तीचे दुकान असलेला निवासी इसमाचा 65 वर्षीय सासरा पेन्शनच्या कामानिमित्त मुंबई येथे गेला होता. त्याला 7 जुन रोजी मुंबईवरून कांद्री येथे आणण्यात आले होते. आरोग्य विभागाकडून होम क्‍वारंटाईन करण्यात आले होते. काही दिवसांपासून
प्रकृती खालावलेला होती. दरम्यान एका खासगी रक्ततपासणी केंद्रवार त्या व्यक्‍तीचे रक्‍तही तपासण्यात आले होते.

टेकाडी (जि.नागपूर): पेंशनच्या कामासाठी मुंबईला गेलेल्या सास-याला कांद्री येथे आणले. त्याची प्रकृती बिघडली. त्या "होमक्‍वारंटाइन' असलेल्या 64 वर्षीय इसमाचा बुधवारी पहाटे घरीच मृत्यू झाला. संशयित वाटल्याने मृतदेह तात्काळ मेयो रुग्णालयात खासगी वाहनाने नेण्यात आला. त्याचा
कोरोना तपासणी अहवाल सायंकाळी पॉझिटिव्ह आल्याने परिसरात खळबळ उडाली. रात्री उशिरा प्रशासनातर्फे परिसर सील करण्यात आला. कुटुंबातील सहा व्यक्तींना नागपूर येथे क्‍वारंटाइन करण्यात आले आहे.

आणखी वाचा : पीक कर्जवाटपात बॅंका का घेतात हात आखडता, कारण आहे "हे'...

कुटुंबातील सहा जण क्‍वारंटाइन
संताजी नगर प्रभाग 5 येथील गाड्यांच्या बॅटरी दुरुस्तीचे दुकान असलेला निवासी इसमाचा 65 वर्षीय सासरा पेन्शनच्या कामानिमित्त मुंबई येथे गेला होता. त्याला 7 जुन रोजी मुंबईवरून कांद्री येथे आणण्यात आले होते. आरोग्य विभागाकडून होम क्‍वारंटाईन करण्यात आले होते. काही दिवसांपासून
प्रकृती खालावलेला होती. दरम्यान एका खासगी रक्ततपासणी केंद्रवार त्या व्यक्‍तीचे रक्‍तही तपासण्यात आले होते. दरम्यान बुधवारी पहाटे अचानक त्यांचा मृत्यू झाला. याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्यात आली. संशयित आढळल्याने त्यांना मेयो रुग्णालयात नेण्याची सूचना आरोग्य केंद्राकडून देण्यात आली. तिथे मृतदेहाची कोरोना तपासणी सायंकाळी पॉझिटिव्ह निघाल्याने त्वरित आरोग्य प्रशासन  मृताच्या घरी तालुका प्रशासन, कन्हान पोलिस, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत प्रशासन पोहचले. परिसर सील करण्यात आला आहे. सोबत परिसरात सोडियम हायपोक्‍लोराईडची फवारणी करण्यात आली. कुटुंबातील 4 पुरुष व 1 महिलेसोबत रक्ताचे नमुने घेणाऱ्या खासगी रक्ततपासणी केंद्रावरील एक जण अशा 6 जणांना मेयो इथे पाठविण्यात आले.

हेही वाचा :कोरोनाचा वार; नागपुरात पाच वस्त्या सील

...म्हणून प्रशासनाची डोकेदुखी वाढली
पहाटे मृत्यू झाल्यानंतर कुटूंबाने मृतदेह  मेयो रुग्णालयात नेण्यात आला. सायंकाळी जेव्हा मृताचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला . मृत इसमाच्या कुटुंबातील इतरांचा दुधाचा व्यवसाय असून एकाचे कार इलेक्‍ट्रीकल दुरुस्तीचे दुकान आहे. अश्‍यात मृत इसम आधीच कोरोना संसर्गित असल्यास त्याचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झालेला असून प्रशासनाची डोकेदुःखी वाढली आहे.

हेही वाचा : झॉलिवुड फ्रांसमध्ये गाजला नागपुरकर तरूणाचा अविष्कार

मृत व्यक्‍तीला होता पक्षाघात
मुंबईवरुन त्यांचे सासरे 7 जूनला कन्हान येथे जावयाकडे आले होते. बुधवारी सकाळी राहत्या घरीच सास-यांचा मृत्यू झाला. मुंबईची पार्श्वभूमी व पक्षाघात असल्याने कन्हान प्राथमिक आरोग्य केन्द्रातून मृतदेह मेयो येथे पाठविला. आज सायंकाळी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह निघाल्याने त्वरित आरोग्य प्रशासन मृताच्या घरी पोहचले व पुढील कार्यवाही सुरू केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Mumbai Return 'report of old age was positive, but after death.