हिवाळी अधिवेशनाबाबत साशंकता; मात्र, रंगरंगोटी, देखभालीवर पाच कोटींचा खर्च

नीलेश डोये
Friday, 23 October 2020

प्रशासनातील अधिकारी यासाठी सकारात्मक नाही. मात्र, अधिवेशन नागपुरात घेण्याचे जाहीर झाल्यामुळे प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फक्त विधानभवनाची रंगरंगोटी करण्यात येणार आहे.

नागपूर : हिवाळी अधिवेशन नागपुरात होण्याबाबत अद्याप साशंकता असताना प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. विधानभवन तसेच परिसराच्या रंगरंगोटीसोबत विविध कामांवर पाच कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.

सात डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. कोरोनाचे सावट असल्याने अधिवेशनावर कोट्यवधींचा खर्च करण्याऐवजी हा खर्च आरोग्यावर करण्यात मागणी होत आहे. राज्यभरातील लोकप्रतिनिधी, नेते, अधिकारी येथे येणार असल्याने कोरोना पसरण्याची भीती आहे. त्यामुळे कॉंग्रेसने विरोधात भूमिका घेतली आहे. कॉंग्रेसचे काही बडे नेतेही यासाठी अनुकूल नसल्याचे सांगण्यात येते.

जाणून घ्या - अबब! नागपुरात जन्माला आले चक्क पाच किलो वजनाचे बाळ

प्रशासनातील अधिकारी यासाठी सकारात्मक नाही. मात्र, अधिवेशन नागपुरात घेण्याचे जाहीर झाल्यामुळे प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फक्त विधानभवनाची रंगरंगोटी करण्यात येणार आहे. शिवाय देखभाल दुरुस्ती, फर्निचर, मांडव, सॅनिटाझेशन व इतर कामे करण्यात येणार आहे.

पुढील आठवड्यात सुरू होतील कामे

यासाठी जवळपास पाच कोटींच्या खर्चाचा प्रस्ताव प्रशासनाकडून करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात सिव्हिल कामे करण्यात येणार आहे. यावर दोन कोटी खर्च करण्यात येणार आहेत. ही कामे पुढील आठवड्यात सुरू होतील.

सविस्तर वाचा - अर्थसंकल्पातून झलकेंचे तुकाराम मुंढे यांना फटके

निवास वाटप समिती

रविभवन, नागभवन व आमदार निवासातील निवास वाटपसाठी समिती गठित करण्यासोबत निवास वाटप करण्याच्या सूचना शासन स्तरावरून देण्यात आल्या. मागील अधिवशनाच्या वेळी फक्त सहाच मंत्री होते. आता त्यात वाढ झाली आहे. त्यामुळे निवास वाटपच्या रचनेत बदल होणार आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Administration begins preparations for winter session