esakal | अबब! नागपुरात जन्माला आले चक्क पाच किलो वजनाचे बाळ
sakal

बोलून बातमी शोधा

A baby weighing Five kg was born in Nagpur

सामान्यपणे जन्माला आलेल्या बाळाचे वजन तीन किलो असते. परंतु, या बाळाचे वजन पाच किलो आहे. सध्या स्थिती सामान्य असल्याने त्यांना इतर वॉर्डात हलवण्यात आले आहे. उपराजधानीत पाच किलो वजनाचे बाळ जन्मल्याची ही पहिली वेळ असेल. परंतु, राज्यात पाच किलो वजनाचे बाळाचा जन्म यापूर्वी झाला आहे.

अबब! नागपुरात जन्माला आले चक्क पाच किलो वजनाचे बाळ

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : उपराजधानीतील गरोबा मैदान परिसरातील डॉ. दळवी स्मारक रुग्णालय व संशोधन केंद्र येथे सोनू सूर्यवंशी दाखल झाल्या होत्या. त्यांची शस्त्रक्रियेतून प्रसूती झाली. त्यांनी पाच किलो वजनाचे बाळ जन्माला दिले. विशेष असे की, बाळ आणि प्रसूत मातेची प्रकृती ठणठणीत आहे.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर नैसर्गिक प्रसूती होईल याची प्रतीक्षा करण्यात आली होती. परंतु, बराच काळाच्या प्रतीक्षेनंतर शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. येथील स्त्री व प्रसूतीरोग तज्ज्ञ डॉ. ज्योती बोरकर, डॉ. मयूरा सेलुकर, डॉ. रिता गोंडाणे, बालरोग तज्ज्ञ डॉ. निखिल सेलुकर, बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. विनोद बोरकर यांनी ही प्रसूती यशस्वी केली आहे.

अधिक माहितीसाठी - श्वास घेण्यास त्रास होतोय? घाबरू नका पुढील उपाय करा आणि घ्या मोकळा श्वास

उपराजधानीत पाच किलो वजनाचे बाळ जन्माला आल्याची ही पहिलीच वेळ असेल असा दावा करण्यात आला आहे. या बाळाची उंचीही ४५ ते ५० सेंटिमीटरच्या जवळ आहे. दरम्यान रुग्णालयाचे अध्यक्ष बलवीरसिंग रेणू, उपाध्यक्ष सुभाष गोतमारे, सचिव पुरुषोत्तम घाटोळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवी भेलोंडे, वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. रवींद्र कोमेजवार यांनी वैद्यकीय पथकाचे अभिनंदन केले.

सामान्यपणे जन्माला आलेल्या बाळाचे वजन तीन किलो असते. परंतु, या बाळाचे वजन पाच किलो आहे. सध्या स्थिती सामान्य असल्याने त्यांना इतर वॉर्डात हलवण्यात आले आहे. उपराजधानीत पाच किलो वजनाचे बाळ जन्मल्याची ही पहिली वेळ असेल. परंतु, राज्यात पाच किलो वजनाचे बाळाचा जन्म यापूर्वी झाला आहे. २०१७ मध्ये कोल्हापूर येथे पाच किलो ८०० ग्रॅम वजनाचे बाळ जन्माला आले होते. ६० सेंटिमीटर त्या बाळाची उंची होती.

संपादन - नीलेश डाखोरे

go to top