कोरोनानंतर आता "या' आजारानेही पसरले हातपाय, एका महिलेच्या मृत्यूमुळे कळले की...

file
file

कामठी (जि.नागपूर): तालुक्‍यात कोरोनाबाधीत रुग्णांनी चौथे शतक पार केले असून मागील बारा दिवसांपासून सतत एकामागे एक बारा जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनाच्या मृत्यूची साखळी मात्र कायम आहे. मागील एक आठवड्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या उच्चांक गाठत असून आज पुन्हा तब्बल58 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यात आरोग्य विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. परंतू काल मृत्यू झालेल्या 60 वर्षीय महिलेला दुसराच भयंकर आजार असल्याचे डॉक्‍टरांकडून सांगण्यात येत असल्यामुळे शहरात खळबळ उडाली.

अधिक वाचा : शेतात नव्हे, अहो मुख्य रस्त्यावर रोवले की धानाचे पऱ्हे...

आता नागरिकही धास्तावले
शहरात कोरोनासह सारीच्या आजाराने सुद्धा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. शहरासह आता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाने हातपाय पसरल्यामुळे बाधीत रुग्णांची संख्या जलद गतीने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाधीत रुग्णांच्या मृत्युमुळे नागरिकांच्या मनात विविध चर्चांना उधाण आले आहे. आजपावेतो तालुक्‍यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 476 वर पोहोचली आहे.

बुधवारी आढळले 58 रुग्ण
आज मिळालेल्या रुग्णांमध्ये ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय व तालुका आरोग्य विभागातील प्रत्येकी एका आरोग्य कर्मचाऱ्यांसह शहरातील तीस, कामठी छावणी परिषद क्षेत्रातील उंटखाणा, गोराबाजारसह सात रुग्णांचा समावेश आहे, तर ग्रामीण भागातील खैरी, म्हसळा, गुमथळा येथील प्रत्येकी एक, रनाळा पाच व येरखेडा गावातील सुपारे नगर, बिबी कॉलनी सह सात रुग्णांचा समावेश आहे. शहरातील नयाबाजार पाच, कुंभारे कॉलनी, दाल ओली नं.1, दाल ओली नं.2, न्यू खलाशी लाईन येथील प्रत्येकी दोन तर इमलीबाग, इस्माईल पुरा, काटे ओली, कोळसा टाल, जयभीम चौक, दर्जी पुरा, नया गोदाम, नया नगर, पूराना भोई पुरा, फुटाणा ओली, बूनकर कॉलनी, भोई लाईन, मेन रोड भाजी मंडी, मोंढा, रमा नगर, वारीसपुरा, हमालपुरा येथील प्रत्येकी एक तर अन्य तीन रुग्णांचा समावेश आहे.

"त्या' महिलेच्या मृत्यूने वाढविला रक्‍तदाब
काल शहरातील तुमडीपुरा येथील एका पॉझिटिव्ह60 वर्षीय महिलेचा नागपुरच्या मेयो रुग्णालयात मृत्यू झाला होता. या महिलेस27 जुलैला श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे मेयो शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांची तपासणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मधुमेही असल्याने त्यांना जोखीम होती. 27जुलैला मृत्यू झाला होता. तिला सारी आजाराची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे शहरात कोरोनासह सारीच्या आजाराने हातपाय पसरायला सुरुवात केली असल्याचे दिसून येते.

 संपादन  : विजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com