दमदार पावसानंतर नागपुकरांचा आर्थिक बचतीचा हा पर्याय खुला 

teres garden
teres garden

नागपूर  : शुक्रवारी झालेल्या पावसानंतर हवामानात झालेला बदल टेरेस गार्डनच्या निर्मितीसाठी लाभदायक ठरणार आहे. शहरातील किमान पन्नास कुटुंब दरवर्षी टेरेस गार्डन संस्कृतीचा भाग होत असून, सर्वसामान्यांवर टाळेबंदीचे आर्थिक संकट आले असताना टेरेस गार्डनचा पर्याय आरोग्यसाठी लाभदायक व किफायतशीर असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्‍त केले आहे. लोक झपाट्याने टेरेसगार्डनचा पर्याय स्वीकारत असल्याचे गुरूदत्त शेंदरे यांनी सांगितले. 

प्रारंभी अवघ्या दोन भाज्या पिकविण्यास सुरूवात करणारे व नंतर वर्षभर बागेची निगा राखणारे कुटुंब शहरात बरेच आहेत. विशेष म्हणजे टेरेस गार्डनमध्ये वर्षाला किमान सातशे ते हजार किलोपर्यंत फळ व पाले भाज्या पिकविण्याची क्षमता असते. शिवाय फावल्यावेळेत काही चवीचे पदार्थ तयार करायचे असतील तर ताज्या भाज्या थेट किचनमध्ये उपयोगात येऊ शकतात असे देखील गुरूदत्त यांनी सांगितले. पारंपरिक पद्धतीने भाज्यांची लागवड केल्यास सामान्य माणसाचे आर्थिक गणित ताळ्यावर येण्यास मदत होईल एवढे निश्‍चित. 

मिर्ची, कोथिंबीर, टमाटर, काकडी, गाजर, दुधी भोपळा, वांगी, तोंडली, भेंडी, पालेभाज्या या किचन गार्डनमध्ये पिकवल्या जाऊ शकतात. रिटेल मॅनेजमेंट विषयात एमबीए असलेले गुरुदत्त शेंदरे सेंद्रिय शेतीचा प्रचार करतात. सध्या त्यांचा अर्बनबाग किचन गार्डन प्रकल्प चर्चेत आहे. प्रत्येकाने आपल्या घरी सेंद्रिय पीक घ्यावे, असे ते अभिमानाने सांगतात. दक्षिण भारतातील सेंद्रिय शेतीची घरगुती पद्धती विषयी ते नागपूरकरांना मार्गदर्शन करतात. 

कोरोनाच्या टाळेबंदीने अनेकांचा रोजगार हिरावला. अनेकांचे घरखर्च आटोक्‍यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण जर घरी आंगण असेल तर महिन्याला किमान आठशे रूपये तरी हमखास वाचवू शकतात. केवळ त्यासाठी शेतीची आवड असयला हवी. नागपूर शहरात सुमारे 130 कुटुंबांनी गेल्यावर्षी टेरेस गार्डन उभारले होते. शुक्रवारी मान्सूनने नागपुरात दमदार हजेरी लावली असल्याने नागपूरकरांसाठी टेरेस गार्डनचा पर्याय खुला झाला आहे.      

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com