ब्रेकिंग नागपूर जिल्हा : हिंगण्यानंतर "या' तालुक्‍यात झाला "कोरोना ब्लास्ट', एकूण रूग्णसंख्या85...

सतिश डहाट
सोमवार, 13 जुलै 2020

"लॉकडाउन' काळात सुरक्षित असलेला जिल्हा लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर पूर्णपणे कोरोनाच्या विळख्यात सापडला. हिंगणा, काटोल, पारशिवनी, नागपूर ग्रामीण आदी तालुक्‍यांमध्ये दररोज रूग्णांची संख्या वाढत असताना सोमवारी अचानक कामठीत 19 रूग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने तालुक्‍यात खळबळ उडाली. सदया येथील मुख्याधिका-यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्यानंतर ती जागा रिक्‍त असल्यामुळे शहराला कुणी वालीच उरला नाही...

कामठी (जि.नागपूर) : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून सलग पाचव्या दिवशी सोमवारी शहरात तेरा तर ग्रामीण भागात पाच अशा एकूण19 रूग्णांची भर पडली. आतापर्यंत तालुक्‍यात शहर व ग्रामीण भागात आढळलेल्या85 रूग्णांपैकी 24 रूग्णांनी कोरोनावर मात केली, तर 61 रूग्णांवर नागपूरात उपचार सुरू आहेत. शहरात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून प्रशासनाने ऐनवेळी या आपातकालीन परिस्थितीमध्ये नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची भुसावळ येथे बदली करून शहर वाऱ्यावर सोडल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

धिक वाचा : मोबाईलसाठी रूसली आणि जीव गमावून बसली...

सोमवारी मिळालेल्या बाधीत रुग्णांमध्ये शहरातील कामगार नगर चार, जूनी खलाशी लाइन दोन, तर न्यू खलाशी लाइन, नया गोदाम, रमानगर, तंबाखू ओली, बैल बाजार, कोळसाटाल, न्यू कामठी परिसरातील छत्रपती नगर येथील प्रत्येकी एक तर ग्रामीण भागातील येरखेडा व भिलगाव येथील प्रत्येकी दोन तर रनाळा येथील एका रुग्णाचा समावेश आहे. या सर्व रूग्णांचा कोरोना रॅपिड अँटीजेन चाचणी अहवाल प्रशासनाला प्राप्त होताच एसडीओ श्‍याम मदनूरकर, तहसिलदार अरविंद हिंगे, बीडीओ सचिन सूर्यवंशी, नगर परिषदचे प्रभारी मुख्याधिकारी रणजित दुसावार, नायब तहसीलदार सुनील तरुडकर, नायब तहसिलदार उके, नगरपरिषदचे स्वास्थ निरीक्षक विजय मेथीया, प्रदीप भोकरे यांनी बाधीत रुग्णाच्या परिसराला भेट देवून रूग्णांना पुढील उपचारासाठी नागपूरच्या मेयो रूग्णालयात हलविले व यांच्या संपर्कात आलेल्या परिवारातील तसेच हायरिस्क व लोरिस्क असलेल्या विलगीकरण कक्षात क्‍वारंन्टाईन करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

अधिक वाचा :आई रडत रडत म्हणाली, बाळा पब्जी खेळू नको रे....नाही तर तू पण...

शहर सोडले वाऱ्यावर
शहरात सध्या कोरोनाबाधीतांची संख्या मोठया प्रमाणात वाढीवर असून शहरातील विविध भागात कोरोनाचा शिरकाव होत असल्याने नागरिकांत भितीचे वातावरण असताना7जुलैला तत्कालीन मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची महामारीच्या वेळी भुसावळ येथे बदली करण्यात आली. जरी आठ जुलैला येथील नायब तहसिलदार रणजीत दुसावार यांना मुख्याधिकारी पदाचे सुत्र सांभाळण्याचे आदेश दिले असले तरी अशा आणिबाणीच्यावेळी मुख्याधिकारी पदाचे सुत्रे सांभाळण्यास इच्छूक नाहीत. नगर पालिकेच्या नियोजनाकरीता मुख्याधिकारी हे पद महत्वाचे असून कामठी नगर पालिकेला मागील सहा दिवसांपासून मुख्याधिकारी नसल्याने ते सुध्दा आपातकालीन परिस्थितीत शहर वा-यावर सोडले असल्याची शहरात चर्चा असून प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
                               

संपादन : विजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After Hingan, "Corona Blast" took place in this taluka.