दोन आठवड्यांपासून सिल असलेल्या पार्वतीनगरच्या नागरिकांचा संताप अनावर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 मे 2020

4 मे रोजी जवाहरनगरात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने या परिसरातील नागरिकांना विलगीकरणात पाठवून पालिकेने परिसर सील केला. त्यानंतर विलगीकरणातील कुणीही कोरोनाबाधित आढळले नाही. त्यामुळे धोका टळला असून पार्वतीनगर परिसरातील प्रतिबंध तत्काळ हटविण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली. पार्वतीनगर परिसरातील सर्वच मार्ग टिनाचे अडथळे लावून बंद करण्यात आले.

नागपूर : दोन आठवड्यांपूर्वी कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आलेल्या पार्वतीनगरातील नागरिक निर्बंधाला कंटाळून आज रस्त्यावर आले. धोका टळल्यानंतरही प्रतिबंध लावल्याने नागरिकांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यात अडथळे निर्माण होत आहे. प्रतिबंधित क्षेत्रातून पार्वतीनगर वगळावे, अशी मागणी करीत नागरिक पार्वतीनगरातील मुख्य रस्त्यावर उतरले. यापूर्वी शनिवारी पांढराबोडी परिसरातील नागरिकांनी आंदोलन केले होते.

4 मे रोजी जवाहरनगरात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने या परिसरातील नागरिकांना विलगीकरणात पाठवून पालिकेने परिसर सील केला. त्यानंतर विलगीकरणातील कुणीही कोरोनाबाधित आढळले नाही. त्यामुळे धोका टळला असून पार्वतीनगर परिसरातील प्रतिबंध तत्काळ हटविण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली. पार्वतीनगर परिसरातील सर्वच मार्ग टिनाचे अडथळे लावून बंद करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना आवश्‍यक गरजांसाठी बाहेर पडणे कठीण झाले आहे. प्रतिबंध लावल्यानंतर नागरिकांनी प्रतिसाद दिला. परंतु, आता दोन आठवड्यांनंतरही प्रतिबंध कायम असल्याने नागरिक संतप्त होऊन रस्त्यावर आले.

अवश्य वाचा- तू जादूटोणा करतोस म्हणून उकरून काढला वाद आणि पुढे...

फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा

पार्वतीनगर परिसरातील नागरिक एकत्र आल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. यावेळी अजनी पोलिस स्टेशनचे ठाणेदार संतोष खांडेकर हे पथकासह उपस्थित होते. त्यांनी नागरिकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. शेवटी मनपा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनाही हस्तक्षेप करावा लागला. 28 दिवसांचा नियम समजून सांगावा लागला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agitation of parvatinagar citizens against restictions