शेतकऱ्यांनो! बोंडअळीपासून सुटका हवीय? वाचा काय सांगतात कृषीतज्ज्ञ

नीलेश डोये
Sunday, 17 January 2021

डिसेंबर-जानेवारी दरम्यान कापसाचे पीक पूर्णपणे काढून टाकावे. नंतर खोडवा (फरदड) घेऊ नये. यामुळे गुलाबी बोंड अळीची शृंखला तुटण्यास मदत होते. कापूस वेचणी झाल्यानंतर लगेचच शेतकऱ्यांनी कापूस आणि इतर पाला-पाचोळा नष्ट करून शेत स्वच्छ ठेवावे.

नागपूर : शेतकऱ्यांनी आगामी हंगामातील कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. यासाठी शेतात‍ असलेले कापसाचे पीक काढून टाकावे. तसेच शेतात असलेल्या कापसाची फरदड घेऊ नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. 

हेही वाचा - १८ वर्ष होवूनही झालं नाही बाळ, पती घरी येताच पत्नी मोठ्यानं किंचाळली अन् घडला थरार

डिसेंबर-जानेवारी दरम्यान कापसाचे पीक पूर्णपणे काढून टाकावे. नंतर खोडवा (फरदड) घेऊ नये. यामुळे गुलाबी बोंड अळीची शृंखला तुटण्यास मदत होते. कापूस वेचणी झाल्यानंतर लगेचच शेतकऱ्यांनी कापूस आणि इतर पाला-पाचोळा नष्ट करून शेत स्वच्छ ठेवावे. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आलेल्या ठिकाणी कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार कीटकनाशकांची फवारणी करावी. फवारणी करताना संरक्षक पोशाख, बूट, हातमोजे, मास्क इत्यादींचा वापर करणे बंधनकारक असल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक प्रज्ञा गोळघाटे यांनी दिली आहे. 

हेही वाचा - काळोखात कुत्रासदृश्य प्राणी दिसल्यानं मारली काठी, समोर येताच वाचवा-वाचवा ओरडली

तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार फवारणी करा  -
नागपूर विभागात सोयाबीन पीक घेतल्यानंतर हरभरा पिकांखालील क्षेत्रामध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. त्यामुळे हरभरा पीक उत्पादक शेतकऱ्यांनी पिकांवर घाटेअळींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास सुरवातीच्या काळात पाच टक्के निंबोळी अर्काने फवारणी करावी. तसेच हरभऱ्याच्या शेतात पक्षी थांबू शकतील असे थांबे उभारावेत, जेणेकरून पिकावरील घाटेअळी नष्ट करण्यास आणि पक्ष्यांना अन्न मिळण्यास मदत होईल. तसेच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार फवारणी करावी,असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agriculture department suggestions for pink bollworm