बापरे! चक्क कृषी अधिकाऱ्याकडूनच तरुणाची फसवणूक, नोकरीच्या बहाण्याने घातला साडेसात लाखांचा गंडा

agriculture officer fraud with youth in nagpur
agriculture officer fraud with youth in nagpur

नागपूर : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, महाबीज भवन अकोला येथे कार्यरत कृषी अधिकाऱ्याने टोळीच्या मदतीने बेरोजगार तरुणाला महाबीजमध्ये कृषी सहाय्यक पदावर नोकरी लावून देण्याच्या नावाने त्याच्याकडून साडेसात लाख रुपये उकळले. नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणाला पैसे परत मागितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी धंतोली पोलिसांनी कृषी अधिकाऱ्यासह चौघांवर गुन्हे दाखल केले. दिगांबर ठाकरे (रा. सालेकसा, फुलचूर-अंबाटोली, जि. गोंदिया), असे आरोपीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार युवक योगेश प्रकाश तराळे (३०, वसंतनगर, जुना बाबुळखेडा) हा उच्चशिक्षित आहे. नोकरी मिळत नसल्याने वडिलाच्या पेंटिंगच्या दुकानात काम करतो. कृषी अधिकारी दिगांबर ठाकरे याने आपल्या टोळीतील सदस्य आनंद केशवराव वानखडे, त्यांचा मुलगा स्वप्नील ऊर्फ पिंटू वानखडे (रा. हुडकेश्‍वर रोड, सौभाग्यनगर) आणि रविशंकर कसाडे ऊर्फ देशमुख (वय २८, उदरी कुही, जि. नागपूर) यांच्या माध्यमातून प्रकाश तराळे यांना जाळ्यात अडकवले. त्यांना मुलगा योगेशला महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, महाबीज भवन अकोला विभागात कृषी सहाय्यक (वर्ग चार) पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. त्यांच्याकडून १० जानेवारी २०१८ ते २५ सप्टेबर २०१९ यादरम्यान ८ लाख ५० हजार रुपये नोकरी लावून देण्याच्या नावाखाली घेतले. ते पैसे आरोपी ठाकरे याने तीनही आरोपींसह वाटून घेतले. नोकरीच्या नावाखाली पैसे लुबाडल्यानंतर आरोपींनी योगेश याला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी धंतोली पोलिसांनी कृषी अधिकाऱ्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com