esakal | प्रेमाला हिंसेची किनार, फोटोंचा होतोय अस्त्रासारखा वापर; आपल्या मुलांची अशी घ्या काळजी
sakal

बोलून बातमी शोधा

crime increases in affairs case in nagpur

काही प्रेमप्रकरणामध्ये प्रियकर-प्रेयसीमध्ये वाद निर्माण झाल्याने ब्रेकअप होताच त्या प्रेमसंबंधाला हिंसक वळण लागते. उपराजधानीत अशा अनेक घटना दिवसेंदिवस समोर येऊ लागल्या आहेत. प्रेमप्रकरणातून शहरात तिघांचा खून आणि एका तरुणीवर प्राणघातक घडल्याची घटना उघडकीस आली आहे. 

प्रेमाला हिंसेची किनार, फोटोंचा होतोय अस्त्रासारखा वापर; आपल्या मुलांची अशी घ्या काळजी

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : 'दूर आशियाना बना ले ए- मोहब्बत...मेरे शहर में अब नफरतों का सैलाब है !' असे एका शायरने आपले मनोगत व्यक्त करीत प्रेमसंबंधातील वितृष्टाचे वर्णन केले आहे. तसेच काही प्रेमप्रकरणामध्ये प्रियकर-प्रेयसीमध्ये वाद निर्माण झाल्याने ब्रेकअप होताच त्या प्रेमसंबंधाला हिंसक वळण लागते. उपराजधानीत अशा अनेक घटना दिवसेंदिवस समोर येऊ लागल्या आहेत. प्रेमप्रकरणातून शहरात तिघांचा खून आणि एका तरुणीवर प्राणघातक घडल्याची घटना उघडकीस आली आहे. 

हेही वाचा - कोळसा हाताळणी विभागाच्या कंत्राटात काळेबेरे! कोराडी वीज केंद्राच्या कारभारावर ताशेरे

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फेसबूक, वॉट्सअ‌ॅप, इंस्टाग्रामसह अन्य सोशल मीडियावरून ओळख झाल्यानंतर मैत्री आणि प्रेम करणाऱ्यांमध्ये लॉकडाउननंतर बरीच वाढ झाली आहे. अशा प्रेमप्रकरणांमध्ये अल्पवयीन मुला-मुलींची मोठी संख्या आहे. ऑनलाइन क्लासेसच्या नावाखाली विद्यार्थीदशेत असलेले तरुण स्मार्टफोनचा अतिवापर करीत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून नवनवीन फ्रेंड्स आणि नवीन नाते जोडण्याचा ते प्रयत्न करतात. तरुण-तरुणी तर सोशल मीडियावर मिळालेल्या प्रियकरावर डोळे झाकून विश्‍वास ठेवतात. यातूनच नव्या नात्यांचा जन्म होतो आणि आईवडीलांपेक्षाही जास्त महत्त्व ते नव्या नात्याला देतात. सोशल मीडियावर रक्ताच्या नात्यांचे बंधन तोडत आपल्या प्रेमासाठी तरुण-तरुणी वाटेल ते करायला तयार असतात. 

हेही वाचा - मोठी बातमी! डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या शोकसभेला संपूर्ण आमटे कुटुंब अनुपस्थित;...

लॉकडाउनमध्ये सोशल मीडियावरून झालेली प्रेमप्रकरणे आणि त्यातून घडलेल्या गुन्ह्यांची नोंद पोलिस ठाण्यात झाली आहे. तसेच एकमेकांची खासगी माहिती, खासगी फोटो आणि चलचित्र सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे अनेक गुन्हे सायबर क्राईममध्ये दाखल आहेत. अतिउत्साह आणि अतिआत्मविश्‍वासामुळे नात्यांना तडे गेल्यानंतर एकमेकांचे आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. 

हेही वाचा - आवाज कितीही बेसूर असला तरी गायला लावतात गाणी, पहाटेचा...

छायाचित्रांचा अस्त्रासारखा वापर -
एकमेकांशी चॅटिंग झाल्यानंतर लगेच प्रेमात पडलेल्यांची संख्या कमी नाही. प्रियकरासोबत फिरायला गेल्यानंतर दोघांनाही फोटो आणि व्हिडिओ काढण्याचा मोह आवरत नाही. ब्रेकअप झाल्यानंतर त्याच व्हिडिओ आणि फोटोंचा अस्त्र म्हणून वापर करण्यात येत आहे. 

हेही वाचा - "साहेब, कपाशीचा लागवड खर्चही नाही निघालो हो...

उपराधानीत रक्तरंजित घटना - 
ब्रेकअप झाल्यानंतर तरुण हा प्रेयसीची बदनामी करण्यावरच थांबत नाही तर तिच्या आयुष्यात अंधार पेरण्याचे काम करतो. गेल्या आठवड्यात प्रेयसीने प्रेमसंबंध कायम ठेवण्यास नकार दिल्यामुळे प्रियकर मोईन खानने प्रेयसीची आजी प्रमिला ऊर्फ लक्ष्मी धुर्वे आणि भाऊ यश यांचा चाकूने भोसकून खून केला. नंदनवनमध्ये प्रशांत देवेंद्र भारसागळे (वय २४ रा. देवरी,जि.गोंदिया) याने प्रेमसंबंध कायम ठेवण्यास नकार देणाऱ्या प्रेयसीवर चाकूहल्ला केला होता. ती सध्या जीवन-मृत्यूशी संघर्ष करीत आहे. तर यशोधरानगरात सिराज शेख याने बहिणीच्या प्रेमास विरोध दर्शवीत तिचा प्रियकर किशोर नंदनवार याचा धारदार शस्त्रांनी भोसकून खून केला. 

हेही वाचा - मोबाईल चॅट डिलीट करून विद्यार्थ्यानं केली आत्महत्या; अमरावतीमधील घटना 

असे राहा सावध -
सोशल मीडियावर ओळख झालेल्या क्षणिक नात्यावर विश्‍वास ठेवू नका 
नात्याची पारख करा, कुटुंबातील नाते जपा 
पालकांनी पाल्यांवर लक्ष ठेवा, त्यांना पुरेसा वेळ द्या 
अल्पवयीन मुली लवकर जाळ्यात अडकतात, त्यामुळे त्यांच्यातील बदलांवर लक्ष ठेवा 
मुला-मुलींचे मोबाईल वारंवार चेक करा 
कुणी ब्लॅकमेलिगं केल्यास वेळीच सावध होऊन पोलिसांकडे धाव घ्या 

go to top