सत्तावीस वर्षीय युवक स्मशानघाटासमोरून गाडी ढकलत घेऊन जात होता, पुढे...

अनिल कांबळे
Thursday, 17 September 2020

राजेंद्र १३ सप्टेंबरला सायंकाळी सात वाजताच्या सुमारास राणी दुर्गावती चौक, बिरसा मुंडा पुतळ्याजवळील चहा टपरीसमोर गाडीला लॉक न करता रोड पार करून चहा पिण्यासाठी गेला होता. काही वेळांनी परत आला असता गाडी उभी केलेल्या ठिकाणी दिसली नाही.

नागपूर : शहरातील विविध भागातून दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपीला यशोधरानगर पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली. सुरेश युवचंद हरीणखेडे (२५, रा. रामनगर, गोंदिया) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र साहेबराव हिंगवे (२७, रा. मुळगाव आगरगाव, पोष्ट सावळी, त. कारंजा घाडगे, जि. वर्धा, ह. मु. मूनलाईट स्टुडीओ मागे, वली बिल्डिंग, तिसरा माळा, सीताबर्डी) असे फिर्यादीचे नाव आहे.

हेही वाचा - सावधान! पायी जाणाऱ्या मुलींनो, जरा सांभाळून..काय आहे प्रकरण... वाचा सविस्तर

राजेंद्र १३ सप्टेंबरला सायंकाळी सात वाजताच्या सुमारास राणी दुर्गावती चौक, बिरसा मुंडा पुतळ्याजवळील चहा टपरीसमोर गाडीला लॉक न करता रोड पार करून चहा पिण्यासाठी गेला होता. काही वेळांनी परत आला असता गाडी उभी केलेल्या ठिकाणी दिसली नाही.

याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आरोपी हा भिलगावकडून आजरी माजरी कडे जाणाऱ्या रस्त्यावरील स्मशान घाटाजवळ ज्युपीटर मोपेड त्यावर मागील व समोरील नंबर प्लेट नसलेली ढकलत जात असल्याचे दिसला. त्यामुळे पथकाला संशय आल्याने त्यास मोपेडची नंबर प्लेट व मालकी हक्काबाबत विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

अधिक माहितीसाठी - जिच्या काठावर वसले आहे अख्खे नागपूर त्या 'नाग नदीचा' इतिहास माहिती आहे का? नाही ना. मग जाणून घ्या

गाडीची पाहणी केली असता डिक्कीत नंबर प्लेट आढळून आली. पथकाने मोपेड गाडी जप्त केली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यामुळे त्यास या गाडी चोरी प्रकरणात पोलिसांनी गुन्हा घडल्यापासून अवघ्या काही तासांतच ताब्यात घेऊन अटक केली.

ही कारवाई उपायुक्त निलोत्पल, वरिष्ठ निरीक्षक रमाकांत दुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पीएसआय श्रीनिवास दराडे, प्रवीण नखाते, विनोज सोलव, गजानन गोसावी, संतोष यादव, निलेश घायवट, किशोर धोटे, प्रफुल चिंतले यांनी केली.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police arrested the notorious bike thief