क्रिकेटपटू सॅम्युअलला घेतले होते ताब्यात, आज स्वीकारणार पोलिस आयुक्तपदाचा पदभार

Friday, 4 September 2020

आयुक्तांसाठी नागपूर शहर नवे नाहीत. यापूर्वी ते २००५ ते २००७ अशी दोन वर्षे ते पोलिस उपायुक्त म्हणून त्यांनी कार्य केले आहे. त्यामुळे शहराची खडानखडा त्यांना माहिती आहे. येथील गुन्हेगारांनाही ते ओळखून आहेत. त्यामुळे आत्तापासून अनेक गुन्हेगारांनी धास्ती घेतली आहे.

नागपूर :  वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू मर्लोन सॅम्युअलला ताब्यात घेऊन मॅच फिक्सिंगचा भांडाफोड करणारे धडाकेबाज पोलिस अधिकारी अशी ख्याती असलेले शहराचे नवे पोलिस आयुक्त अमितेश कुमार शुक्रवारी रुजू होणार आहेत. सकाळशी बातचीत करताना त्यांनी नागरिकांची सुरक्षा करणे पोलिसांचे असलेले आद्यकर्तव्यच आपण प्राधान्याने बजावणार असल्याचे सांगितले.

आयुक्तांसाठी नागपूर शहर नवे नाहीत. यापूर्वी ते २००५ ते २००७ अशी दोन वर्षे ते पोलिस उपायुक्त म्हणून त्यांनी कार्य केले आहे. त्यामुळे शहराची खडानखडा त्यांना माहिती आहे. येथील गुन्हेगारांनाही ते ओळखून आहेत. त्यामुळे आत्तापासून अनेक गुन्हेगारांनी धास्ती घेतली आहे. अमितेश कुमार हे मुंबईत राज्य गुप्त वार्ता विभागात सहआयुक्त पदावर कार्यरत होते. त्यांना पदोन्नती देत नागपूर शहराचे पोलिस आयुक्तपद देण्यात आले. 

जाणून घ्या - नागपूरकरांनो सावधान! घराबाहेर जाणार असाल तर जरा थांबा.. 'ते' ठेऊन आहेत वाईट नजर
 

अर्थशास्त्र आणि सायबर क्राईममध्ये ते पदव्युत्तर आहेत. त्यामुळे सायबर गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ते विशेष प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नागपूर शहरातील गुन्हेगारीचा आढावा घेण्यात येईल. त्यानुसार गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना आखल्या जातील. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न असेल. अपघाताची संख्या कमी करण्यासाठी अभिनव उपक्रम राबविण्यात येईल, असे अमितेश कुमार म्हणाले.

 

असा केला बेटिंगचा भंडाफोड

नागपुरात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यासाठी वेस्ट इंडीजचा संघ हॉटेल प्राईडमध्ये थांबला होता. अष्टपैलू खेळाडू मर्लोन सॅम्युअलला हॉटेल प्राईडच्या लँडलाईनवर वारंवार कॉल येत असल्याचे लक्षात आल्यामुळे तत्कालीन पोलिस उपायुक्त अमितेश कुमार यांनी त्यावर लक्ष केंद्रित केले. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा क्रिकेट बेटिंगचा जगभरात गोरखधंदा सांभाळणारा क्रिकेट बुकी मुकेश कोचर दुबईतून मॅच फिक्सिंगसाठी वारंवार मर्लोनसोबत संपर्क करत होता. हे लक्षात आल्यामुळे अमितेश कुमार यांनी हे संभाषण टेप करून क्रिकेट जगतात खळबळ उडवून दिली होती. नागपूर पोलिसांच्या तपासाच्या आधारे आयसीसीने मर्लोन सॅम्युअलवर दोन वर्षाची बंदीही घातली होती. क्रिकेट बेटिंगचा भंडाफोड केल्याबद्दल अमितेश कुमार यांचे सर्वत्र कौतुक झाले होते. 
 

महिला व वृद्धांच्या सुरक्षेला प्राधान्य देणार

शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासह महिला व वृद्धांच्या सुरक्षेला विशेष प्राधान्य देण्यात येईल, तसेच सायबर गुन्हेगारांवर अंकुश कसण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रीया नवनियुक्त पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. अमितेश कुमार हे आज शुक्रवारी पोलिस आयुक्तपदाचा पदभार स्विकारणार आहेत. अमितेश कुमार हे मुंबईत राज्य गुप्त वार्ता विभागात सहआयुक्त पदावर कार्यरत होते. अर्थशास्त्र आणि सायबर क्राईममध्ये ते पदव्युत्तर आहेत. त्यामुळे सायबर गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ते विशेष प्रयत्न करणार असल्याचे ‘सकाळ’शी बोलताना म्हणाले. नागपूर शहरातील गुन्हेगारीचा आढावा घेण्यात येईल. त्यानुसार गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना आखल्या जातील. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न असेल. अपघाताची संख्या कमी करण्यासाठी अभिनव उपक्रम राबविण्यात येईल. नागपूरवासीयांनी आम्हाला सहकार्य करावे, अशी प्रतिक्रिया अमितेश कुमार यांनी दिली.  

संपादन : अतुल मांगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amitesh Kumar will take over as Nagpur Police Commissioner today