
नागपूर : लहान मुले मातीच्या गोळ्याप्रमाणे असतात. त्यांना जसे घडवले तसेच ते घडतात. त्यांना घडविण्याचे काम प्राथमिक पूर्व शिक्षणाच्या माध्यमातून अंगणवाडीत होते. या अंगणवाड्या किरायाच्या घरात आहेत. त्यामुळे मुलांना पूरक वातावरणनिर्मिती करता येत नाही. जिल्ह्यातील अनेक अंगणवाड्यांची विदारक परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या अंगणवाड्यांपैकी जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निधीतून पहिल्या टप्प्यात शंभर अंगणवाड्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी १४ कोटींची तरतूदही करण्यात आली आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये सद्यःस्थितीत २,३२४ अंगणवाड्या कार्यरत आहेत. यामध्ये २,१६१ नियमित तर २६२ मिनी अंगणवाड्यांचा समावेश आहे. येथे जवळपास सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील ६९ हजार ९८० बालके तर तीन वर्षे ते सहा वर्षे वयोगटातील ८३ हजार ४७५ अशी एकूण एक लाख ५३ हजार ४५५ बालके आहेत. तर १२,५७१ गरोदर माता यांना अंगणवाडीच्या माध्यमातून आहार पुरविण्यात येतो.
बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, बालकांमधील रक्तक्षय, जन्मत: कमी वजनाचे असणाऱ्या बालकांचे प्रमाण कमी करणे, बालकांची आरोग्य तपासणी, लसीकरण आदी कार्य करण्यात येते.
परंतु, आजही जिल्ह्यात असलेल्या एकूण अंगणवाड्यांपैकी शेकडो अंगणवाड्या खासगी इमारती अथवा समाज मंदिरात भरतात. शंभर अंगणवाड्यांसाठी बांधकाम होणार आहे. स्वतःच्या मालकीची इमारत होणार असल्याने मुलांसाठी पूरक असे बोलके भीत्तीचित्र, विविध रंगकाम तयार करता येणार आहे.
अतिरिक्त ६.२४ कोटींच्या निधीची मागणी
डीपीसीकडून आठ कोटींवरचा निधीही मंजूर झाला आहे. परंतु, महिला व बालकल्याण विभागाने डीपीसीकडे अतिरिक्त ६.२४ कोटींच्या निधीची मागणी केली आहे. त्यासही मंजुरी देण्यात आली आहे.
- भागवत तांबे,
अधिकारी, जि. प.च्या महिला व बालकल्याण विभाग
संपादन - नीलेश डाखोरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.