कोरोनाचे कारण देत अंकित शाहुचा जामिनासाठी अर्ज; न्यायालयाने फेटाळला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जून 2020

अंकित शाहूवर उषा सेवकदास कांबळे (वय 54) आणि दिड वर्षिय राशी रविकांत कांबळे या दोघींची हत्या केल्याचा आरोप आहे. 17 फेब्रुवारी 2018 साली हे प्रकरण घडले असून आरोपीने यापूर्वी जामिनासाठी दाखल केलेले अर्ज वेळोवेळी रद्द करण्यात आले आहे. आरोपी अंकित संध्या मध्यवर्ती कारागृहामध्ये आहे. 

नागपूर : शहरातील बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांडातील आरोपी अंकित शाहूने जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी तीसऱ्यांदा अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने तो फेटाळला. अंकित शाहूवर उषा सेवकदास कांबळे (वय 54) आणि दिड वर्षिय राशी रविकांत कांबळे या दोघींची हत्या केल्याचा आरोप आहे. 17 फेब्रुवारी 2018 साली हे प्रकरण घडले असून आरोपीने यापूर्वी जामिनासाठी दाखल केलेले अर्ज वेळोवेळी रद्द करण्यात आले आहे. आरोपी अंकित संध्या मध्यवर्ती कारागृहामध्ये आहे. 

दाखल अर्जानुसार, मध्यवर्ती कारागृहामध्ये कोरोना आजार पसरण्याचा धोका आहे. अन्य आरोपीपेक्षा अंकितची तथाकथित भूमिका कमी गंभीर स्वरूपाची आहे. कोरोना आजाराचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता 11 मे 2020 रोजी राज्याच्या उच्चाधिकार समितीने कारागृहातील विशिष्ट कैद्यांना जामिनावर मुक्त करण्याबाबत आदेश दिले आहेत. त्यानुसार, जामिन देण्यात यावा, अशी विनंती अर्जाद्वारे न्यायालयाला केली. कारागृहामध्ये कोरोना आजाराचा धोका असल्याने कारागृह प्रशासनामार्फत त्याने न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला होता. सुनावणी दरम्यान, कारोनाच्या साथीशीवाय खटल्यासबंधिच्या प्राप्त परिस्थितीत कोणताही बदल झाल्याचे दिसून येत नाही.

बापरे : स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता प्रिती पोलिसांच्या पाठबळाने झाली 'ब्लॅकमेलर'; वाचा सविस्तर..

तसेच, अर्जदारासह अन्य आरोपींविरुद्ध भादवि कलम 302 व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हे दाखल आहेत. दाखल गुन्हे गंभीर स्वरुपाचे असून महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाकडून 14 मे 2020 प्राप्त झालेले पत्र पाहता अशा आरोपींना जामिनावर सोडण्याची तरतूद नाही. त्यामुळे, अर्ज फेटाळण्यात यावा, अशी विनंती न्यायालयाला केली. सर्व बाबीचा विचार करता न्यायालयाने आरोपी अंकित शाहुचा जामीन अर्ज रद्द केला. शासनातर्फे मुख्य जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी बाजु मांडली. या प्रकरणी विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील पाटिल यांच्यासमक्ष सुनावणी झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ankit Shahu's bail application citing Kovid-19 reasons; The court rejected