अभ्यास झाला ना... मग द्या परीक्षा अन्‌ व्हा इंजिनिअर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

सीईटी सेलमार्फत ऑनलाइन स्वरुपात ही परीक्षा होईल. एमबीए आणि एमएमएस या दोन अभ्यासक्रमांसाठी परीक्षा 14 आणि 15 मार्च रोजी घेण्यात येईल. एमसीएसाठी प्रवेशपरीक्षा 28 मार्च होईल. एम.आर्क.ची प्रवेश परीक्षा 10 मे रोजी होईल. हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटरिंग टेक्‍नॉलॉजी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा 10 मे रोजी होईल. पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा 16 मे रोजी घेण्यात येईल. या सर्व परीक्षा ऑनलाइन घेण्यात येतील.

नागपूर : महाराष्ट्रातील विविध इंजिनिअरिंग महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. बीई, बीटेक, बीफार्म, कृषी, फिशरीज सायन्स, डेअरी टेक्‍नॉलॉजी या अभ्यासक्रमांसाठी 13 ते 17 एप्रिल आणि 20 ते 23 एप्रिल या काळात प्रवेश प्रक्रिया घेण्यात येईल.

हे वाचाच - मी बँक अधिकारी आहे, तुमच्या मुलीसोबत लग्न करीन!

सीईटी सेलमार्फत ऑनलाइन स्वरुपात ही परीक्षा होईल. एमबीए आणि एमएमएस या दोन अभ्यासक्रमांसाठी परीक्षा 14 आणि 15 मार्च रोजी घेण्यात येईल. एमसीएसाठी प्रवेशपरीक्षा 28 मार्च होईल. एम.आर्क.ची प्रवेश परीक्षा 10 मे रोजी होईल. हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटरिंग टेक्‍नॉलॉजी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा 10 मे रोजी होईल. पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा 16 मे रोजी घेण्यात येईल. या सर्व परीक्षा ऑनलाइन घेण्यात येतील.

इंजिनिअरिंग परीक्षेसाठीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सात जानेवारी रोजी सुरू झाली. 29 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येतील. सीईटीच्या संकेतस्थळावर सात जानेवारी ते सात मार्चपर्यंत परीक्षा शुल्क ऑनलाइन स्वरुपात भरता येईल. पीसीएम आणि पीसीबी अशा दोन गटांमध्ये ही परीक्षा होईल. बी.ई. आणि बी.टेक.ला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना फिजिक्‍स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्‍सचे पेपर्स देणे बंधनकारक आहे.

लेखनिकाची सुविधा घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एक तासामागे 20 मिनिटे अतिरिक्त वेळ देण्यात येईल. परीक्षेत अकरावीच्या अभ्यासक्रमाला 20 टक्के तर बारावीच्या अभ्यासक्रमाला 80 टक्के महत्त्व राहील. परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नसून, उपयोजन आधारित प्रश्‍न विचारले जातील. मॅथेमॅटिक्‍स, फिजिक्‍स व केमिस्ट्री, बॉटनी व झूलॉजी असे तिन्ही पेपर प्रत्येकी शंभर गुणांचे राहतील. प्रत्येक पेपरला दीड तासाचा अवधी राहील. एमएचटीसीईटीचा निकाल पर्सेंटाइलमध्ये जाहीर केला जाईल. परीक्षेचे माध्यम इंग्रजी आणि मराठी किंवा उर्दू राहील. मॅथेमॅटिक्‍सचा पेपर मात्र केवळ इंग्रजीत देता येईल. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रासाठी पर्याय देता येणार आहेत.

तारखांनिहाय माहिती

  • ऑनलाइन अर्जनोंदणी : 7 जानेवरी ते 29 फेब्रुवारी
  • ऑनलाइन शुल्क भरणा : 7 जानेवारी ते 7 मार्च
  • प्रवेशपत्र ऑनलाइन उपलब्ध करणे : 5 ते 23 एप्रिल
  • परीक्षा दिनांक : 13 ते 17 एप्रिल आणि 20 एप्रिल ते 23 एप्रिल

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Announcement of MHT-CET schedule