esakal | नुकसानाबाबतचा प्रशासनाचा प्रस्तावच चुकीचा;  फेरआराखडे सादर करण्याच्या केंद्रीय पथकाच्या सूचना 
sakal

बोलून बातमी शोधा

Application has some mistake said central government team

आज विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केंद्राकडून हव्या असलेल्या मदतीच्या आर्थिक आराखड्यावर केंद्रीय पथकाशी चर्चा केली.

नुकसानाबाबतचा प्रशासनाचा प्रस्तावच चुकीचा;  फेरआराखडे सादर करण्याच्या केंद्रीय पथकाच्या सूचना 

sakal_logo
By
राजेश चरपे

नागपूर : विभागात ऑगस्टमध्ये आलेला पूर गेल्या शंभर वर्षांत उद्भवलेली आकस्मिक परिस्थिती होती. हानी अपरिमित आहे. केंद्राकडे अंतिम आराखडे पाठविताना रस्ते, पाटबंधारे व पशुधनाच्या नुकसानाची मुद्देसूद, संदर्भ व आराखड्यांसह आकडेवारी सादर करा, अशी सूचना केंद्रीय पथकाने आज केली. 

आज विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केंद्राकडून हव्या असलेल्या मदतीच्या आर्थिक आराखड्यावर केंद्रीय पथकाशी चर्चा केली. बैठकीला राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे वरिष्ठ अधिकारी रमेश कुमार गंटा, केंद्रीय वित्त विभागाचे व्यय संचालक आर. बी. कौल, केंद्रीय नियंत्रण विभागाचे अधीक्षक अभियंता महेंद्र सहारे, केंद्रीय कृषी मंत्रालयाचे आर. पी. सिंग, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता तुषार व्यास उपस्थित होते. तर विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर आदी अधिकारी उपस्थित होते. 

हेही वाचा - फोन आला म्हणून कडाक्याची थंडी असूनही गेला गच्चीवर अन् सकाळी आढळला युवकाचा मृतदेह   

नुकसान मोठे 

समिती सदस्यांनी विभागात आलेले महापूर आकस्मिक गंभीर घटना असल्याचे मान्य केले. या काळात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची नुकसान झाल्याचे पाहणीत पुढे आल्याचे पथकाने मान्य केले. केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन मदत निधीच्या निकषाप्रमाणे सर्व अहवाल तयार करून देण्याचेही त्यांनी सांगितले. 

८१४ कोटी हवे 

पुराचा तडाखा बसलेल्या भागांमधील पाणीपुरवठा योजना, पाटबंधारे योजनेतील पायाभूत सुविधा उभारणे, रस्ते, पूल, वीजपुरवठा व  आरोग्य व्यवस्था सुरळीत करण्यासाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन मदत निधी निकषाप्रमाणे ही रक्‍कम अंदाजे १९१.६१ कोटी होते. मात्र, पायाभूत सुविधा, कृषी, घरांचे नुकसान, पशुधनाचे नुकसान, रस्त्यांचे नुकसान हे अपरिमित हानीत मोडणारे आहे.

नक्की वाचा संदीप जोशींवर गोळीबार ते राजीनामा; मुंढे आले अन् गेले, कोरोनामुळे सुधारली आरोग्य यंत्रणा

त्यामुळे केंद्र शासनाने ६३२.२६ कोटींची अतिरिक्त मदत करावी. यासाठी निकषाप्रमाणे १९१.६१ व अतिरिक्त मागणीनुसार ६३२.२६ कोटी असे एकूण ८१४.८८ कोटी रुपये मिळावेत, अशी शिफारस विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी समितीपुढे केली.

संपादन - अथर्व महांकाळ 

go to top