प्रशासकांची नियुक्ती अनिश्चित काळासाठी

नीलेश डोये
Thursday, 5 November 2020

कायद्यानुसार प्रशासक सहा महिन्यापेक्षा जास्त काळ राहू शकत नाही. दरम्यानच्या काळात निवडणुका घेणे बंधनकारक आहे. कोरोनामुळे तुर्तास तरी निवडणूक घेणे शक्य नाही. त्यामुळे कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे सरकारने कायद्यात सुधारणा करून अध्यादेश काढला.

नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांवर केली जाणारी प्रशासकाची नियुक्ती आता अनिश्चित काळासाठी राहाणार आहे. पूर्वी सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ प्रशासक नेमता येत नव्हता. ही सहा महिन्यांची अट काढून टाकण्यात आली असून निवडणुकीपर्यंत त्यांचा कार्यकाळ राहणार आहे.

काही कारणाने निवडणूक लांबल्यास प्रशासकाची तात्पुरती नियुक्ती केली जात होती. कायद्याने सहा महिन्यांपेक्षा अधिककाळ प्रशासक नेमता येत नव्हता. तशी परिस्थिती उद्‍भवल्यास सरकारला पुन्हा मदतवाढ द्यावी लागत होते. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ संपला असून सहा महिन्यांपेक्षा अधिका काळ गेला आहे. त्यामुळे महानगर पालिका, नगर परिषद, नगर पंचायत आता प्रशासकचा नियुक्ती अनिश्चित काळासाठी राहील असा सरकारनेच कायद्यात दुरुस्ती करून अध्यादेश काढला आहे.

घर खरेदीचे स्वप्न राहणार स्वप्नच! राज्य सरकार करणार स्टॅम्प ड्युटीत वाढ

कोरोनामुळे अनेक निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. राज्य निवडणूक आयोगाने कोरोनाचे कारणसांगत निवडणुका घेण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे राज्यातील १२ हजार पेक्षा जास्त ग्रामपंचायतीच्या निवडणुका लांबणीवर टाकाव्या लागल्यात. या निवडणूक न होणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात आले. त्याच प्रमाणे मुदत संपणाऱ्या जिल्हा परिषदांवर कोरोनामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असून त्यावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. राज्यातील काही महानगर पालिका, नगरपालिका, नगर पंचायतींचा कार्यकाळ संपला असून काहींचा संपणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून याकरता निवडणूक घेण्यात येईल.

काहींवर प्रशासक नियुक्त करून सहा महिन्यापेक्षा अधिकचा कार्यकाळ होणार आहे. कायद्यानुसार प्रशासक सहा महिन्यापेक्षा जास्त काळ राहू शकत नाही. दरम्यानच्या काळात निवडणुका घेणे बंधनकारक आहे. कोरोनामुळे तुर्तास तरी निवडणूक घेणे शक्य नाही. त्यामुळे कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे सरकारने कायद्यात सुधारणा करून अध्यादेश काढला. यानुसार प्रशासकाची मुदत निवडणूक होत पर्यंत वाढविता येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appointment of administrators indefinitely