esakal | घर खरेदीचे स्वप्न राहणार स्वप्नच! राज्य सरकार करणार स्टॅम्प ड्युटीत वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

The state government will increase stamp duty

शासनाने यात एक टक्का अधिभार वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ५ टक्के मुद्रांक शुल्क आकारण्यात येईल. महानगरपालिका अधिनियम, महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती अधिनियमात सुधाकर करण्यात आली. २७ ऑक्टोबरला सुधारणा अध्यादेश काढला.

घर खरेदीचे स्वप्न राहणार स्वप्नच! राज्य सरकार करणार स्टॅम्प ड्युटीत वाढ

sakal_logo
By
नीलेश डोये

नागपूर : सरकारने मुद्रांक शुल्कात (स्टॅम्प ड्युटी) कपात करून मालमत्ता खरेदीचा बेत आखलेल्यांना मोठा दिलासा मिळाला होता. परंतु, आता सरकारने यात एक टक्का अधिभार वाढविण्याचा निर्णय घेतला. ही वाढ फक्त शहरी भागासाठीच असणार आहे. जानेवारीपासून हा अधिभार लागू होणार असल्याने कपातीचा आनंद औटघटकेचा ठरणार आहे.

जीएसटी, नोटबंदीनंतर कोरोनामुळे उद्योग, व्यापार डबघाईस आले. अनेक उद्योग बंद पडले. लोकांचे आर्थिक उत्पन्न कमी झाले. लोकांनी मालमत्ता खरेदीपासून फारकत घेतली. यामुळे रिअल इस्टेटच्या व्यवसाय मंदावला. विकासकासोबत शासनाच्या तिजोरीवरही परिणाम याचा झाला. त्यामुळे सरकारने रेडीरेकनरच्या दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतला.

अधिक वाचा - ...अन् शोकाकुळ नातेवाईक मृतदेह विसाव्यावर सोडून सैरावैरा पळू लागले

गेल्या काही वर्षात रेडीरेकनरचे दर ‘जैसे थे’च ठेवण्यात आले. मुद्रांक शुल्कातून शासनाच्या तिजोरीत हजारो कोटी जमा होतात. कोरोनामुळे तिजोरीवर झालेला परिणाम झाला. रिअल इस्टेटला चालना देण्यासोबत तिजोरीत पैसा येण्यासाठी सरकारने मुद्रांक शुल्कात कपात केली. मुंबईत तीन तर इतर महानगर पालिका क्षेत्रात दोन टक्के कपात केली. त्याचप्रमाणे महानगरपालिकांचा एक टक्के अधिभारही कमी करण्यात आला. त्यामुळे प्रत्यक्षात तीन टक्के मुद्रांक शुल्क कमी झाले. याचा सकारात्मक परिणाम दिसून आला.

ही कपात सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीसाठी करण्यात आली. पूर्वी तो सहा टक्के होता. तर जानेवारी २०२१ ते ३१ मार्च २०२१ या काळात शासनाकडून दीड टक्के कपात करण्यात येणार होता. तसेच महानगरपालिकेचा अर्धा टक्का अधिभार कमी करण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे जानेवारी ते मार्च दरम्यान चार टक्के मुद्रांक शुल्क लागणार होते.

क्लिक करा - टाकू का विहिरीत उडी? असे म्हणताच गेला तोल...

आता शासनाने यात एक टक्का अधिभार वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ५ टक्के मुद्रांक शुल्क आकारण्यात येईल. महानगरपालिका अधिनियम, महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती अधिनियमात सुधाकर करण्यात आली. २७ ऑक्टोबरला सुधारणा अध्यादेश काढला.

एप्रिलपासून मुद्रांक शुल्क सात टक्के?

नगर विकास विभागाकडून काढण्यात आलेल्या अध्यादेशात जानेवारीपासून अर्धा टक्काच सूट देण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे. तसेच एक टक्का अधिभार वाढविण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सूटचा (कपात) कालावधी वगळल्यास नंतर म्हणजे १ एप्रिलपासून मुद्रांक शुल्क सात टक्के होणार असल्याचे सांगण्यात येते.

संपादन - नीलेश डाखोरे

go to top