गुप्त माहिती मिळाली अन्‌ हाती लागले हे...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 जानेवारी 2020

शहरात कोट्यवधीचे अंमली पदार्थांची विक्री-खरेदी होत आहे. मात्र, कोट्यवधी रुपयांमध्ये असलेल्या या खेळात काही संशयित पोलिस कर्मचारी सहभागी असल्यामुळे मोठमोठे ड्रग्स तस्कर अजूनही पोलिसांच्या रडारवर आले नाहीत. यापूर्वी नंदनवन पोलिस ठाण्यातील काही कर्मचारी स्वतः एमडी तस्कारांशी हातमिळवणी करीत ड्रग्स विक्रीसाठी सज्ज झाले होते.

नागपूर : "ड्रग्स फ्री' नागपूर शहर ही संकल्पना पोलिस आयुक्‍तांनी साकार करण्याचा मानस केला असून, गुन्हे शाखेला कामगिरी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील एमडी तस्कारांची यादी तयार करून गुन्हे शाखा छापेमारी करीत आहेत. मात्र, अनेक ठिकाणी कुंपनच शेत खात असल्याची स्थिती असल्यामुळे पोलिस आयुक्‍तांची संकल्पना पूर्णपणे साकार होणार की नाही, यावर संशय निर्माण झाला आहे. मंगळवारी मेफेड्रोन (एमडी) या अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. त्यांच्याकडून एक लाख 17 हजार रुपयांचे एमडी जप्त करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावती मार्गावरील वाडी परिसरात एकजण एमडीची तस्करी करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्‍त आयुक्‍त नीलेश भरणे आणि पोलिस उपायुक्‍त गजानन राजमाने यांना मिळाली. त्यांनी लगेच एका पथकाला माहितीच्या आधारावर सापळा रचण्याचे आदेश दिले. पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात मृणाल गजभिये (24, रा. आनंदनगर, सीताबर्डी) याला वाडी येथील मेहता काम्प्लेक्‍ससमोर ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याच्याकडून 57 हजार रुपये किंमतीचे 19 ग्रॅम एमडी सापडले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. मृणालला शहरातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. त्यानंतरही तो शहरात दाखल झाला व एमडीची तस्करी करीत होता, हे विशेष.

हेही वाचा - आता कसं म्हणणार? काजवाऽ उडंऽ किर किर किरंऽऽऽ

यानंतर नवीन मनीषनगर परिसरात तस्कर लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी हॉटेल हो कलेक्‍शन (ओयो) सापळा रचला होता. त्यावेळी राहुल ऊर्फ चिल शंकर लेपसे (23, रा. दिघोरी नाका, साईनगर) आणि जिया खान ताज खान (31, रा. भालदारपुरा गंजीपेठ) हे संशयास्पद वावरताना दिसले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडे 10 ग्रॅम एमडी मिळाले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. तसेच त्यांच्याकडून एमडीसह मोबाईल असा एकूण 1 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

काय - राज्यातील सतरा 'टायगर अभी जिंदा नही हैं'

काहींची भूमिका संशयास्पद

शहरात कोट्यवधीचे अंमली पदार्थांची विक्री-खरेदी होत आहे. मात्र, कोट्यवधी रुपयांमध्ये असलेल्या या खेळात काही संशयित पोलिस कर्मचारी सहभागी असल्यामुळे मोठमोठे ड्रग्स तस्कर अजूनही पोलिसांच्या रडारवर आले नाहीत. यापूर्वी नंदनवन पोलिस ठाण्यातील काही कर्मचारी स्वतः एमडी तस्कारांशी हातमिळवणी करीत ड्रग्स विक्रीसाठी सज्ज झाले होते. तर यापूर्वी नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील झालेल्या ड्रग्सच्या कारवाईत "तुलसी' नावाच्या महिलेने टीप दिल्यामुळे आरोपी पळून गेल्याची चर्चा होती. आता तुलसीला वाली नसल्यानंतरही वसुली करीत असल्याची चर्चा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: arrested three drug smugglers