esakal | ट्रकच्या डिझेल टँकवर सुरू होती युवकाला मारहाण; बचावासाठी गेलेल्या पोलिसांवरही केला आरोपींनी हल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

Assault on police in Nagpur

बांधून ठेवलेल्या युवकाची सुटका करीत असताना आरोपींनी पोलिस शिपाई अरविंद यादव यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने प्रहार केला. तसेच फिर्यादी पोलिस उपनिरीक्षक नवनाथ पाटवदकर यांना सुध्दा जिवानिशी ठार मारण्याच्या उद्देशाने चाकूने हल्ला केला.

ट्रकच्या डिझेल टँकवर सुरू होती युवकाला मारहाण; बचावासाठी गेलेल्या पोलिसांवरही केला आरोपींनी हल्ला

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : ट्रकमधील माल चोरीच्या संशयावरून एका अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण करीत असताना घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस उपनिरीक्षक, सहायक पोलिस उपनिरीक्षक, दोन पोलिस शिपाई यांना ट्रकचालक आणि क्लीनरने लोखंडी रॉड आणि धारदार चाकूने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास कळमना कळमना गेट क्रमांक १ येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालक आणि क्लीनरला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समशेरसिंग रंधावा (२४), मनदीपसिंग सिध्दु (२६) अशी आरोपींची नावे आहेत. दोघेही पंजाबचे निवासी असून भाजी घेऊन ते कळमना बाजारात आले होते. मंगळवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास दोन्ही आरोपींनी कळमना बाजार प्रवेशव्दार क्रमांक १ च्या आत गिरीश नावाच्या युवकास दोराने बांधून ट्रकच्या डिझेल टँकच्या वर ठेवले.

जाणून घ्या - ‘पदवीधर’ची धुरा सांभाळणारे नगरसेवक अपदवीधर! ३४ पैकी फक्त सहा जण बजावू शकणार मतदानाचा हक्क

त्याला शस्त्राचा धाक दाखवून मारपीट करीत होते. त्याला जिवानिशी ठार मारण्याची धमकीही देत होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. या पथकात पोलिस उपनिरीक्षक नवनाथ पाटवदकर, सपोउपनि मदनसिंग जनकवार, पोलिस शिपाई अरविंद यादव आणि विजय तिडके यांचा समावेश होता.

बांधून ठेवलेल्या युवकाची सुटका करीत असताना आरोपींनी पोलिस शिपाई अरविंद यादव यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने प्रहार केला. तसेच फिर्यादी पोलिस उपनिरीक्षक नवनाथ पाटवदकर यांना सुध्दा जिवानिशी ठार मारण्याच्या उद्देशाने चाकूने हल्ला केला.

हेही वाचा - जेवण बेतले जीवावर; शहराबाहेर जेवण करण्यास गेलेल्या युवकांचा जागीच मृत्यू 

याशिवाय सपोउपनि मदनसींग जनकवार आणि पोलिस शिपाई विजय तिडके यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला करून जखमी केले. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून दोन्ही आरोपींना अटक केली.

संपादन - नीलेश डाखोरे