esakal | Video : विश्व महायुद्धाचे भाकित वर्तविल्याने खळबळ... वाचा संपूर्ण बातमी
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

पाच जूनला रात्रीचे माद्य चंद्रग्रहण भारतातून दिसले. ग्रहण मोक्ष सहा जून रोजी पहाटे 2.34 मिनिटांनी झाला. शुक्र ग्रह नुकताच मार्गी झालेला असून यावेळी महाराष्ट्राला नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागेल. एखाद्या यशस्वी कीर्तिमान नेत्याची हत्या झाल्यास आश्‍चर्य वाटायला नको. काही देशातील नेत्यांच्या हटवादीपणा व खोट्या अहंकारामुळे जगाचे विश्‍वयुद्धाच्या दिशेने एक पाऊल पुढे पडेल, असेही संकेत आंतरराष्ट्रीय ज्योतिष्याचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी दिले आहेत.

Video : विश्व महायुद्धाचे भाकित वर्तविल्याने खळबळ... वाचा संपूर्ण बातमी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पाच जून ते पाच जुलै या एक महिन्याच्या काळात दोन चंद्रग्रहण आणि एक कंकणाकृती सूर्यग्रहण आहे. त्यातील एक चंद्रग्रहण शुक्रवारी (ता. 5) झाले. हा प्रकार संपूर्ण विश्‍वासाठी अत्यंत चिता वाढविणारा ठरणार आहे. ग्रहांचे वक्रीपण देशात नैसर्गिक आपत्तीजनक परिस्थिती निर्माण करेल. काही भागात ओला दुष्काळ पडेल. जागतिक मंदीच्या तडाख्यात कित्येक देश होरपळले जातील.

भारताच्या अर्थव्यवस्थेवर जबरदस्त विपरीत परिणाम पडणार आहे. त्यामुळेच शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांनी सावधानता बाळगण्याची गरज असल्याचे भाकीत आंतरराष्ट्रीय ज्योतिष्याचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी केले आहे. एखाद्या नेत्याच्या अहंकारामुळे जगाला विश्‍वयुद्धाच्या दिशेने जावे लागेल, असे संकेतही त्यांनी दिले आहेत.पाच जूनला रात्रीचे माद्य चंद्रग्रहण भारतातून दिसले. ग्रहण मोक्ष सहा जून रोजी पहाटे 2.34 मिनिटांनी झाला. माद्य चंद्रग्रहणाच प्रत्यक्ष ग्रास होत नसून चंद्रबिंब फक्त थोडे धूसर होते. सध्या गुरू आणि शनी दोन्ही ग्रह अस्त आहेत. त्याचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर पडणार आहे. एखाद्या यशस्वी कीर्तिमान नेत्याची हत्या झाल्यास आश्‍चर्य वाटायला नको, काही देशातील नेत्यांच्या हटवादीपणा व खोट्या अहंकारामुळे जगाचे विश्‍वयुद्धाच्या दिशेने एक पाऊल पुढे पडेल, असेही संकेत त्यांनी दिले आहे.

21 जुलैला कंकणाकृती सूर्यग्रहण

रविवार 21 जुलै रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण राहणार आहे. भारतातील दक्षिणेकडील काही भागातून हे कंकणाकृती सूर्यग्रहण दिसेल. आशिया खंडातील काही देश आफ्रिका, दक्षिण युरोप व पॅसिफिक महासागरातून ते दिसेल. या ग्रहणाचे वेध मात्र 20 जूनपासून म्हणजे शनिवारी रात्री 9 वाजून 40 मिनिटानंतर सुरू होतील. त्यामुळेच 20 जून रोजी सकाळी पाच वाजेपर्यंत बाल, वृद्ध रोगी यांनी काळजी घ्यावी. वृषभ, कर्क, मिथुन राशींना त्रासदायक राहील.

जगात जबरदस्त विपरित परिणाम

हे ग्रहण ज्येष्ठ महिन्यात असल्याने सत्ताधारी वर्गाला त्रासाला सामोरे जावे लागण्याचे योग आहेत. या दिवशी महत्त्वाचे सहा ग्रह एकाच वेळी चाल बदलून वक्री राहणार आहेत. यात बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू, केतू यांचा समावेश असल्यामुळे जगात जबरदस्त काही तरी विपरित परिणाम दिसून येतील. जगात एकप्रकारे खळबळ माजेल, असा दावाही वैद्य यांनी केला आहे.

जाणून घ्या : Video : वर्ध्यात घडली चिड आणणारी घटना; सैतान युवकाचे चिमुकल्याशी अनैसर्गिक कृत्य अन्‌...


तीन ग्रहणांमुळे राज्य नैसर्गिक आपत्तीत

या ग्रहणांच्या मालिकेतील तिसरे ग्रहण पण चंद्रालाच लागणार आहे. रविवार पाच जुलैला हे माद्य चंद्रग्रहण मात्र, भारतातून दिसणार नाही. तरीपण भारतीय वेळेनुसार ग्रहण स्पर्श रात्री 8 वाजून 37 मिनिटांनी होणार आहे. ग्रहणमोक्ष रात्री 11 वाजून 2 मिनिटांनी होणार आहे. पाच जुलैच्या माद्य चंद्रग्रहणानी भारतात मोठे परिवर्तन होतील. गुरू धनू राशीत परत आलेला वक्रीच राहणार आहे. शुक्र ग्रह नुकताच मार्गी झालेला असून यावेळी महाराष्ट्राला नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागेल. एका महिन्यात येणारे हे तीन ग्रहणे देशाला तसेच संपूर्ण विश्‍वालाच प्रगती व विकासासाठी तसेच कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर एक अडचणच निर्माण करतील, असे डॉ. वैद्य यांचे भाकीत आहे.