नागपूरकरांनो सावधान! औषध दुकानांमध्ये गेल्यावर घ्या काळजी..अन्यथा होतील गंभीर परिणाम; वाचा सविस्तर 

Asymptomatic corona patients are freely going to buy medicines
Asymptomatic corona patients are freely going to buy medicines
Updated on

नागपूर : सध्या सही हजारांवर सौम्य लक्षणे असलेले कोरोनाबाधित घरीच विलगीकरणात आहेत. त्यांना मेयो, मेडिकल किंवा महापालिकेच्या रुग्णालयांतून मोफत औषधोपचार व्हावेत. परंतु, रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयातील किंवा मेयो, मेडिकलमधील डॉक्टरांकडून औषधांऐवजी केवळ सल्ला मिळतो. त्या बाधितांच्या हाती प्रिस्क्रिप्शन दिले जाते.

सोमवारी (ता.३१) नागपुरात ५ हजार ८१२ कोरोनाचे सौम्य लक्षणे असलेले रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. नियमानुसार या रुग्णांना आवश्यक औषधे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळायला हवी. मात्र, महापालिकेच्या डॉक्टरांकडून केवळ सल्ला देण्यात येत असल्याची माहिती एका गृहविलगीकरणातील व्यक्तीने दिली. 

त्यांना औषधपुरवठा करण्यात येत असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. परंतु, त्यांना मेडिकल, मेयोसह महापालिकेच्या रुग्णालयात औषधाऐवजी प्रिस्क्रिप्शन देऊन त्यांची बोळवण केली जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

औषधांच्या दुकानात मुक्तसंचार

सौम्य लक्षणे असलेले कोरोनाबाधित हातात असलेले प्रिस्क्रिप्शन घेऊन औषध दुकानांसमोर उभे राहून औषध खरेदी करतात. यामुळे संक्रमणाची मोठी जोखीम आहे. सर्वच रुग्णालयांत अत्यवस्थ रुग्ण वाढत असल्याने बाधितांसाठी औषधे कमी पडत आहेत. पूर्वी कोरोनाच्या सर्व रुग्णांवर रुग्णालयात उपचार होत असून, येथे मोफत औषधे मिळत होती. गृहविलगीकरणातील रुग्णांनाही महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने रुग्णालयात तपासणी केल्यावर औषधे नि:शुल्क उपलब्ध करून द्यायला हवी, अशी मागणी जोर धरत आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com