अल्पवयीन मुलीवर शेतात अत्याचार

टीम ई सकाळ
Saturday, 17 October 2020

पुन्हा तोच प्रकार घडत असल्याने प्रकार उघडकीस आला. याबाबत कन्हान पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली असून घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आरोपी मनीष रवींद्र चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक रवींद्र त्रिपाठी यांचा मार्गदर्शनात एपीआय लक्ष्मी मलकुवर अधीक तपास करीत आहेत.

कन्हान (जि. नागपूर) : कन्हान शहरातअंतर्गत निलज (खंडाळा) गावातील बारावर्षी अल्पवयीन मुलीवर कोरोना-१९ लाॅकडाऊनच्या काळात एक हजार रुपये देण्याचे आमिष दाखवून युवकाने अत्याचार केला. यामुळे परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

निलज (खंडाळा) गावाशेजारी बारा वर्षीय अल्पवयीन मुलगी व मुलगा आज साडेअकरा ते बाराच्या दरम्यान बकऱ्या चारायला गेले असता आरोपी मनीष रवींद्र चौधरी (वय २५, रा. खंडाळा) हा अल्पवयीन मुलीजवळ आला व तिला एक हजार रुपये देतो म्हणून आमिष दाखवून जबरदस्ती शेतात घेऊन जाऊन लैंगिक अत्याचार केला. एप्रिल ते १६ ऑक्टोबर २०२० या सहा महिन्यांत कोविड-१९च्या लाॅकडाॅउनच्या काळातही हा प्रकार घडला.

हेही वाचा - आता लायसन्ससाठी कुठेही जायची गरज नाही; घरबसल्या पुढील पद्धतीने काढा लर्निंग लायसन्स

वडिलांच्या लक्षात ही बाब आली असता आरोपीच्या घरी विचारपूस करायला गेले. यावेळी आरोपीने शिवीगाळ करून त्यांना मारहाण केली. आरोपीने एप्रिल महिन्यातही सदर मुलीवर अत्याचार केला होता. घरी कुणाला घटनांबद्दल सांगितले असता परिवाराला मारण्याची धमकी दिली होती.

पुन्हा तोच प्रकार घडत असल्याने प्रकार उघडकीस आला. याबाबत कन्हान पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली असून घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आरोपी मनीष रवींद्र चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक रवींद्र त्रिपाठी यांचा मार्गदर्शनात एपीआय लक्ष्मी मलकुवर अधीक तपास करीत आहेत.

हेही वाचा - चार एकरात 51 क्विंटल सोयाबीन, विधवा महिला अलिशान बी. ने घेतले विक्रमी उत्पादन

कोविड रुग्णसेवेतील परिचारिकेचा मृत्यू

जुलै महिन्यापासून ३३ वर्षीय परिचारिका मेडिकलच्या कोविड रुग्णसेवेत होत्या. साडेतीन वर्षांच्या जुळ्या मुलांपासून दूर राहून त्या सुरक्षेचा नियमाचे पालन करीत होत्या. परंतु, २८ सप्टेंबर रोजी त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. याच दरम्यान त्यांना डेंग्यूचीही लागण झाली. त्यांची प्रकृती खालावत गेली. एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. उच्चशिक्षित व मनमिळाऊ स्वभाव असलेल्या या परिचारिकेच्या आकस्मिक मृत्यूने मेडिकलच्या परिचारिकांमध्ये शोककळा पसरली आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Atrocities in the field on a minor girl