वाढदिवसाच्या पार्टीत राडा, मित्रावर प्राणघातक हल्ला

attack on man in friend birthday party in nagpur
attack on man in friend birthday party in nagpur

नागपूर : वाढदिवसाची पार्टी साजरी करीत असताना मित्रांमध्ये झालेल्या भांडणात एकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना मंगळवारी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास पाचपावली पोलीस ठाण्यांतर्गत घडली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे. 

अनमोल सलुजा(वय २०), निक्कू सरदार (वय ३०), सब्बी गोतरा (वय २८), अंगद मुल्ला (वय २६) आणि जसप्रीत तुली (२०) सर्व रा. बुद्धनगर, पाचपावली, अशी आरोपींची नावे आहेत. मोहम्मद नावेद सैफी शाहीद नदीम रा. मोमीनपुरा असे तक्रारदाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी जसप्रीत तुली याचा वाढदिवस होता. या वाढदिवसाच्या पार्टीचे आयोजन त्याने केले होते व त्याने इतरांसह तक्रारदाराला बोलवले होते.

बुद्धनगर गुरुद्वारा परिसरातील रस्त्यावर डीजे लावून सर्वजण डान्स करत असताना निक्कू सरदार याचा शाहबाज खान नावाच्या तरुणाला धक्का लागला. यावरून त्यांच्यात वाद -झाला. ते एकमेकांना शिवीगाळ करीत असताना नावेद हा मध्यस्थी करण्यासाठी गेला. त्यावेळी आरोपींनी संगनमताने त्याच्यावर फायटर व कटीयारने वार करून खुनाचा प्रयत्न केला. यामुळे नावेद याच्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्याला रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी नावेद याच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. आरोपी फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता.

जमिनीच्या वादातून जीवे मारण्याची धमकी -

नागपूर : जमिनीच्या वादातून एका व्यक्तीला ५० ते ६० व्यक्तींनी जिवानिशी ठार मारण्याची धमकी दिली. तसेच त्याच्या शेतातील गेटचे नुकसान करून अनधिकृतपणे जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. ही घटना कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. 

मनोज जयनारायण शर्मा(५२ रा. लेंड्रा पार्क रामदासपेठ, समिर प्रल्हाद शर्मा (३६ रा. इंदोरा चौक, प्रशांत सुरेंद्र सहानी (४० रा. कडबी चौक, विजय रॉय(४५)रा. मानकापूर व परवेज (३०) तसेच इतर ५० ते ६० त्यांचे साथीदारांनी १२ डिसेंबर २०१९ ते २ जुलै २०२० च्या सकाळी १० च्या सुमारास स्मृतीनगर मौजा बोखारा येथील खसरा क्र. १७१/१  सुधीर नंदलाल दीक्षित (५२) यांच्या शेतावर जाऊन जमिनीच्या वादातून त्यांच्याशी भांडण केले. सोबतच जमीन खाली केली नाही, तर जिवानिशी ठार मारण्याची धमकी देऊन दीक्षित यांच्या शेतातील लोखंडी गेटचे नुकसान करुन त्यांचा रस्ताही अडविला व अनधिकृतपणे जमिनीवर ताबा घेण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी दीक्षित यांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध कोराडी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com