प्रेयसीने लग्नाला नकार दिल्यामुळे प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न

अनिल कांबळे
Monday, 12 October 2020

गावाशेजारी असलेल्या गावातील २० वर्षीय युवती रियाशी (बदललेले नाव) एका संगणक प्रशिक्षण संस्थेत २०१६ मध्ये त्याची ओळख झाली. बारावीनंतर रियाने नर्सिंगला ॲडमिशन घेतले तर शुभम गावातच शिक्षण घेत होता. रिया अंबाझरी रोडवरील एका रुग्णालयात नर्स म्हणून नोकरीला लागली. यादरम्यान दोघांच्या भेटीगाठी होत राहिल्या. रियाने त्याला नोकरी शोधून घरी येऊन मागणी घालायची अट ठेवली.

नागपूर : ‘प्लीज, तू त्याच्याशी लग्न नको करू. मी तुझ्यासाठी काहीपण करेल. आपण लग्न करू. सुखाने संसार करू’, असा हट्ट प्रियकराने प्रेयसीकडे केला. मात्र, प्रेयसीने आपले लग्न ठरल्याचे सांगून त्याला नकार देत विसरून जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे प्रियकराने आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रकरण पोलिसांत गेले. शुभम डोईफोडे (२४) असे प्रियकराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम हा पाटणसावंगी येथे कुटुंबासह राहतो. त्याचे वडील खासगी नोकरी करतात. शुभम सध्या बेरोजगार आहे. गावाशेजारी असलेल्या गावातील २० वर्षीय युवती रियाशी (बदललेले नाव) एका संगणक प्रशिक्षण संस्थेत २०१६ मध्ये त्याची ओळख झाली.

क्लिक करा - हाकलल्यानंतरही सतत रुग्णालयात यायचा श्वान; सत्य आले समोर

बारावीनंतर रियाने नर्सिंगला ॲडमिशन घेतले तर शुभम गावातच शिक्षण घेत होता. रिया अंबाझरी रोडवरील एका रुग्णालयात नर्स म्हणून नोकरीला लागली. यादरम्यान दोघांच्या भेटीगाठी होत राहिल्या. रियाने त्याला नोकरी शोधून घरी येऊन मागणी घालायची अट ठेवली.

प्रेमात कोरोनाचे विघ्न

गेल्या सहा महिन्यांपासून शुभम नोकरीच्या शोधात होता. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर नव्याने नोकरी मिळण्याची शक्यता मावळली. शुभमने रियाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, वडिलांनी नकार दिल्यामुळे रियाचा नाइलाज झाला.

सविस्तर वाचा - दुर्दैवी! अन्न पाण्यावाचून पडून होता आजारी अवस्थेत; कोणी हात लावण्यासही नव्हते तयार; अखेर घडले माणुसकीचे दर्शन

तिचा झाला साखरपुडा

एका डॉक्टर मुलाचे स्थळ आल्याने रियाच्या वडिलांनी होकार कळवला. गेल्या आठवड्यात दोघांचा साखरपुडा झाला. दिवाळीत लग्न करण्याचा मुहूर्त निघाला. रियाचा साखरपुडा झाल्यामुळे तो निराश झाला होता.

फक्त एकदा भेट

शुभमने रियाला कॉल केला. शेवटचे भेटायचे असल्याचे सांगितले. शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास शुभम अंबाझरी तलाव परिसरातील स्वामी विवेकानंद स्मारकाजवळ आला. रियाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तिने ठरलेले लग्न मोडण्यास नकार दिल्यामुळे त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attempted suicide of boyfriend in Nagpur