esakal | स्टार्टअप : ते करताहेत जुन्या मशीनचे ऑटोमेशन; नागपुरातील पहिलाच प्रयोग

बोलून बातमी शोधा

Automation of old machines The first experiment in Nagpur}

हर्षद वसुले आणि रोहित शेंडे यांनी दहा वर्षांपूर्वी के. डी. के. अभियांत्रिकी महाविद्यालयातून मेकॅनिकल शाखेतून पदवी मिळविली आहे. सध्या ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटरशी जुळले आहेत.

स्टार्टअप : ते करताहेत जुन्या मशीनचे ऑटोमेशन; नागपुरातील पहिलाच प्रयोग
sakal_logo
By
मंगेश गोमासे

नागपूर : उद्योगांमध्ये नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऑटोसिस्टिम आल्याने जुन्या लेथ मशीन भंगारात जाण्याची वेळ आली आहे. लेथ मशीनचा छोटामोठा व्यवसाय करणाऱ्यांचेही नुकसान झाले आहे. ही अडचण सोडविण्यासाठी जुन्याच लेथ मशीनला सीएनसीची जोड देऊन ऑटोमेटिक करण्याच्या प्रयत्नाला यश आले आहे.

नागपूरच्या दोन अभियंत्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटरमध्ये या प्रयोगास सुरुवात केली आहे. यात ते यशस्वी ठरले असून, ऑटोमेशनचे त्यांनी स्टार्टअप सुरू केले आहे. उद्योगात ऑटोमेशनची प्रक्रिया रुळली आहे. त्यामुळे उद्योगात जलदगतीने काम होताना दिसून येते. मात्र, यामुळे जुने यंत्र भंगारात काढण्याची वेळ आली आहे.

जाणून घ्या - कुटुंबीयांसोबतचे 'ते' जेवण ठरले अखेरचे, घराच्या दिशेने निघालेल्या 'बरखा'वर काळाचा घाला

सातत्याने बदलणारे तंत्रज्ञान यामुळे अनेकदा कंपन्यांना या मशीन बदलणे परवडणारे नसतात. याशिवाय छोटे उद्योग त्यामुळे मागे पडताना दिसून येतात. मात्र, या जुन्या मशीनचे ऑटोमेशन करून त्यांना वापरात आणण्याच्या हेतूने मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या हर्षद वसुले आणि रोहित शेंडे यांनी आपली संकल्पना विद्यापीठाच्या इन्क्युबेशन केंद्रात मांडली.

विद्यापीठाने या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी त्याला मदत केली. त्यांनी जुन्या लेथ मशीनला कॉम्प्युटर प्रोग्राम, कंट्रोल पॅनेल, सर्वो मोटार आणि बॉल स्क्रूच्या साहाय्याने ऑटोमेशन करण्यात यश मिळविले. त्यामुळे आता या मशीन उद्योगामध्ये वापर करता येणे शक्य होणार आहे. इतकेच नव्हे, तर बहुतांश मशीनचे ऑटोमेशन करण्याची क्षमती त्यांनी विकसित केली असून त्यामध्ये स्वतःचे स्टार्टअप सुरू करीत आपल्या व्यवसायास सुरुवात केली आहे. तीन वर्षांपासून ते यशस्वीरीत्या विविध मशीनचे ऑटोमेशन करीत आहेत.

हर्षद वसुले आणि रोहित शेंडे यांनी दहा वर्षांपूर्वी के. डी. के. अभियांत्रिकी महाविद्यालयातून मेकॅनिकल शाखेतून पदवी मिळविली आहे. सध्या ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटरशी जुळले आहेत.

जाणून घ्या - सुखी संसाराचा करूण अंत; मैत्रिणीच्या लग्नास जाण्यास पतीनं केला विरोध अन् नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

केवळ मशीनचे ऑटोमेशन नव्हे, तर आर्म मॅन्युफॅक्चरिंग मशीन आणि बायोमेट्रिक मशीन तयार करण्याचेही काम करीत आहे. अशा प्रकारच्या ऑटोमेशनची गरज उद्योगासह महाविद्यालयांनाही पडते. त्यामुळे ज्यांना हे शिकायचे आहे, त्यांनाही मदत करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. 

सीएनजी मशीनमध्ये बदलण्यात यश
विद्यापीठाच्या मदतीने जुन्या लेथ मशीन सीएनजी मशीनमध्ये बदलता येणे शक्य झाले. त्यामुळे या मशीनही उपयोगात आणता येणे शक्य होणार आहे. 
- हर्षद वसुले, अभियंता