सण, समारंभ झाले "लॉक', या व्यवसायावर आली अवकळा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जून 2020

शहरात अंदाजे 1,800 पेक्षा अधिक नॉन ब्रॅण्डेड कूल जारमधील थंड पाण्याची विक्री करणारे व्यावसायिक आहेत. त्यात अंदाजे पाच ते सहा हजार कामगार कार्यरत आहेत. या व्यवसायात महिन्याला सरासरी अडीच कोटींच्या जवळपास उलाढाल होत असे. सलग साडेतीन महिने हा व्यवसाय बंद असल्याने अंदाजे 10 कोटींपेक्षा अधिकचा फटका या व्यावसायिकांना बसला आहे

नागपूर : शहरातील विविध समारंभाची शान बनलेल्या कूल जारमधील थंड पाण्याच्या वाढत्या मागणीमुळे केवळ उन्हाळ्यात चालणारा हा व्यवसाय बाराही महिने तेजीत होता. यामुळे अनेक नवउद्योजकांनी या व्यवसायाला सुरुवात केली होती. कोरोनामुळे मात्र कूल जारमधील थंड पाण्याच्या व्यवसायावरही पाणी फेरले. यातील पाच ते सहा हजार कामगार बेरोजगार झाले असून, 30 टक्के व्यावसायिकांवर या व्यवसायाला "लॉक' लावण्याची वेळ आल्याची माहिती आहे. 

लग्नात हौसेच्या खर्चाला फाटा देऊन प्रत्येकजण शुद्ध पाण्याचा आग्रह धरला जात होता. त्यामुळेच खासगी, सरकारी कार्यालये, दुकाने, मॉल्स, विद्यार्थी, ट्युशन्स क्‍लासेससह सर्वत्र दररोज लाखो लिटर कूल जारमधील थंड पाण्याची मागणी होत होती. उन्हाळ्यात तर पाणी व्यवसायिकांना श्वास घ्यायला वेळ नसतो, एवढी डिमांड असते. परिणामी, मागणी 40 टक्‍क्‍यांनी वाढते. यंदा मात्र, कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भरउन्हाळ्यातच टाळेबंदी झाली. खासगी, शासकीय, हॉटेल्स, लग्नसोहळे, बैठका, सभा, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शनी आदी कार्यक्रम टाळेबंदीमुळे रद्द झालेत आणि या व्यवसायाला ग्रहण लागले. परिणामी, लाखोंची गुंतवणूक सुरू केलेल्या या व्यावसायिकांना आता हे थंड पाणी विकायचे कोणाला, असा प्रश्‍न पडला आहे. 

अनलॉक, तरीही उद्योगांसमोर काळोखच, ही आहे कारणे...! 
 

शहरात अंदाजे 1,800 पेक्षा अधिक नॉन ब्रॅण्डेड कूल जारमधील थंड पाण्याची विक्री करणारे व्यावसायिक आहेत. त्यात अंदाजे पाच ते सहा हजार कामगार कार्यरत आहेत. या व्यवसायात महिन्याला सरासरी अडीच कोटींच्या जवळपास उलाढाल होत असे. सलग साडेतीन महिने हा व्यवसाय बंद असल्याने अंदाजे 10 कोटींपेक्षा अधिकचा फटका या व्यावसायिकांना बसला आहे.

तुकाराम मुंढे देणार का बारा वर्षांचा हिशेब! काय आहे प्रकरण वाचा
                                                                                              

अनलॉकनंतर आता दुकाने, खासगी आणि शासकीय कार्यालये उघडण्यात येऊ लागली आहेत. त्यामुळे थंड पाण्याची मागणी होत असली तरी त्याची टक्केवारी फक्त 20 टक्केच आहे. पूर्वी सर्वसाधारण व्यक्तीही बाटलीबंद पाणी सर्वत्र पिताना दिसत होता. आता कोरोनाच्या भीतीमुळे सर्वसामान्य नागरिकही घरूनच पाणी सोबत घेऊन बाहेर पडतो आहे. 

उन्हाळा कूल जारमधील थंड पाण्यासाठी सुगीचा काळ असतो. यंदा टाळेबंदीमुळे या व्यवसायात शून्य टक्के ग्रोथ होती. संपूर्ण लग्नसमारंभ, सोहळ्याचा सिझनही गेला. शासनाकडून आकारण्यात येणारे शुल्कही या व्यवसायातून निघणे कठीण झाल्याने अनेकांनी या व्यवसायाला रामराम ठोकला आहे. हा उद्योग मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. 
अभिताभ मेश्राम, अध्यक्ष, प्रोवेस ग्रुप 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bad Effect on Cold Water Business in Lockdown