गडचिरोली येथील मशिदीमध्ये वास्तव्यास होते तबलिगी, न्यायालयाने दिला जामीन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जून 2020

मशिदीमध्ये येणाऱ्या अनेकांशी ते संपर्कात आल्याचा आणि व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत 9 जणांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली होती.

नागपूर : कझाकिस्तान आणि किर्गिस्तानमधील 9 परदेशी नागरिकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जामीन मंजूर केला. व्हिसाच्या नियमांचे आणि कोरोना आजाराच्या पार्श्‍वभूमीवर दिलेल्या अधिसूचनांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गडचिरोली पोलिसांनी त्यांना 5 एप्रिल रोजी सर्वांना अटक केली होती. जामिनासाठी त्यांनी नागपूर खंडपीठामध्ये धाव घेत अर्ज दाखल केला होता. 

अर्जानुसार, किर्गिस्तान येथील बॅटिरोव शुख्रटबेक (27), उसमाब्नोव उसलबाई (42), सुवानकुलोव्ह मकसॅटबॅक (30), सादिकोव्ह इसरोइल (58) आणि कझाकिस्तान येथील तोगाईबायेव नूरबोलत वय (29), आशिर्बायव रुसलान वय (29), ओमरोव एपकाहट (34), येरालिब्नोव्ह झांबोटा (34), मुखमवबेथस्नोव्ह आयदार (37) आदी पर्यटक व्हिसावर देशामध्ये आले. दिल्ली येथील तबलिग समाजाच्या वार्षिक कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांनी 11 मार्च रोजी गडचिरोली गाठले. 

या काळात ते गडचिरोली येथील मशिदीमध्ये वास्तव्यास होते. दरम्यान, मशिदीमध्ये येणाऱ्या अनेकांशी ते संपर्कात आल्याचा आणि व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत 9 जणांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली होती.

झाड केले कमी उंच, फळे झाली टंच!   

मात्र, गडचिरोलीमध्ये प्रवेश करताच सर्वांनी त्याची कल्पना लिखित स्वरुपामध्ये पोलिस आयुक्तांना दिली होती. तसेच, गडचिरोली पर्यटनाचे ठिकाणसुद्धा आहे. त्यामुळे, नियमांचे उल्लंघन होत नाही. त्यानुसार, जामीन देण्याची विनंती त्यांनी याचिकेतून केली होती. सर्व बाजू लक्षात घेता उच्च न्यायालयाने या 9 परदेशी नागरिकांचा जामीन मंजूर केला.

नागपुरात बहरले सोनू सूदचे प्रेम; शंकरनगरातील ब्रेड पकोडा व कटिंग चहाचा होता दिवाना 

संध्या वास्तव्यास असणाऱ्या चंद्रपूर येथील मशीदीमध्ये राहण्याचा आणि दर सोमवारी चंद्रपूर येथील पोलिस ठाण्याला हजेरी लावण्याचे आदेश दिले. तसेच, या नागरिकांचे पासपोर्ट तपासण्याचे आदेशामध्ये नमूद केले. अर्जदारांतर्फे ऍड. फिरदोस मिर्झा आणि ऍड. मीर नगमान अली यांनी, राज्य शासनातर्फे ऍड. अमित माडीवाले यांनी बाजू मांडली. या प्रकरणी न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bail granted to Tablighis in Kazakihstan, Kyrgyzstan