भरधाव बलेनो कार झाडावर आदळली, तिघे जागीच ठार

Monday, 9 November 2020

कमल ढोरे (वय २५, छत्रपतीनगर नागपूर), तुषार लोखंडे (वय ३३ नागपूर) गाडीचालक प्रवीण चोपडे (वय ३३ नागपूर) अशी मृतांची नावे आहेत. तर गाडी मालक निहाल चांदूरकर (वय ३०रा. नागपूर) असे जखमीचे नाव आहे.

नागपूर : भरधाव मारुती बलेनो कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात कळमेश्वर-नागपूर रोडवरील दहेगावजवळ रविवारी रात्री झाला. अपघात एवढा भीषण होता की भरधाव कार झाडावर आदळल्याने कारचा अक्षरशः चुराडा झाला.

कमल ढोरे (वय २५, छत्रपतीनगर नागपूर), तुषार लोखंडे (वय ३३ नागपूर) गाडीचालक प्रवीण चोपडे (वय ३३ नागपूर) अशी मृतांची नावे आहेत. तर गाडी मालक निहाल चांदूरकर (वय ३०रा. नागपूर) असे जखमीचे नाव आहे.

सविस्तर वाचा - घरी सरणाची तयारी अन्‌ मृत महिला अचानक झाली जिवंत; उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

 
मिळालेल्या माहितीनुसार, मारुती बलेनो कारने (क्रमांक mh 49 bb 4236) चार जण कळमेश्वरकडून नागपूरकडे जात होते. दहेगावजवळ पोहोचले असताना अचानक चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर आदळली. हा भीषण अपघात दहेगावजवळ रविवारी रात्री घडला.

अपघात इतका भीषण होता की, भरधाव कार झाडावर आदळल्याने कारचा चुराडा झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. क्रेनच्या मदतीने कारला बाजूला करण्यात आले. जखमी आणि मृतदेह काढताना पोलिसांना गॅस कटरची मदत घ्यावी लागली. 
 
कळमेश्वर-नागपूर मार्गावर पंधरा दिवसांपूर्वी दुचाकीचा अपघात झाला होता. यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. कळमेश्वर-नागपूर रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत. त्यामुळे अपघाताच्या घटना वारंवार घडत आहेत. रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवण्यात यावे, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. 

संपादन  : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: baleno car hit a tree, killing three on the spot