उपद्रव शोधपथकाचे ओ$$$$ काट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जानेवारी 2020

पालिकेच्या उपद्रव शोधपथकाने या दुकानदारांना लक्ष्य केले. 3 जानेवारीपासून उपद्रव शोधपथकाने नायलॉन मांजा व प्लॅस्टिक पतंग विक्रेत्यांवर कारवाई सुरू केली. 3 ते 6 जानेवारीदरम्यान प्लॅस्टिक पतंग विक्रेत्यांवर कारवाई करीत साडेतीनशेवर पतंग जप्त व अकरा हजारांचा दंड करण्यात आला.

नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोधपथकाने प्लॅस्टिक विक्रेत्यांवर कारवाई तीव्र केली असून यात प्लॅस्टिक पतंग विक्रेत्यांचाही समावेश आहे. शहरात मोठ्या प्रमाणात असलेल्या पतंग दुकानांवर धाड टाकत उपद्रव शोधपथकाने साडेतीनशेवर पतंग ताब्यात घेतल्या. एवढेच नव्हे तर नॉयलॉन मांजाही जप्त केला. या दुकानदारांकडून अकरा हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

मकरसंक्रांतीनिमित्त शहरात मोठ्या प्रमाणात पतंग विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. या दुकानांमध्ये प्लॅस्टिक पतंग व नायलॉन मांजा दुरूनच चमकताना दिसून येत आहे. प्लॅस्टिक बंदीला वाकुल्या दाखवित दुकानदारांनी प्लॅस्टिक पतंग विक्री सुरू केली. पालिकेच्या उपद्रव शोधपथकाने या दुकानदारांना लक्ष्य केले. 3 जानेवारीपासून उपद्रव शोधपथकाने नायलॉन मांजा व प्लॅस्टिक पतंग विक्रेत्यांवर कारवाई सुरू केली. 3 ते 6 जानेवारीदरम्यान प्लॅस्टिक पतंग विक्रेत्यांवर कारवाई करीत साडेतीनशेवर पतंग जप्त व अकरा हजारांचा दंड करण्यात आला. 3 जानेवारीला पथकाने सतरंजीपुरा झोनमधील 98 दुकानांची तपासणी केली. यातील राणी दुर्गावती चौकातील सलीम खान पतंगवाला या दुकानातील नॉयलॉन मांजाच्या 5 चक्री व 50 प्लॅस्टिक पतंग जप्त केल्या. 4 जानेवारीला धंतोली झोनमधील पथकाने 12, नेहरूनगर झोनमधील पथकाने 20, गांधीबाग झोनमधील पथकाने 50, सतरंजीपुरा झोनमधील पथकाने 30, आशीनगर झोनमधील पथकाने 30, अशा एकूण 142 प्लॅस्टिक पतंग जप्त केल्या. या दुकानदारांकडून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

 सविस्तर वाचा - भुकेलेल्यांना अन्न पुरविणारी रोटी बॅंक

6 जानेवारीला धंतोली, सतरंजीपुरा व लकडगंज झोन पथकाने एकूण 91 दुकानांची तपासणी करून 147 प्लॅस्टिक पतंग जप्त करीत 6 हजार रुपये दंड वसूल केला. प्लॅस्टिक पतंग व नॉयलॉन मांजाच्या कारवाईसाठी मनपाचे उपद्रव शोधपथक लक्ष ठेवून आहे. पथकाद्वारे दररोज वेगवेगळ्या दुकानांमध्ये तपासणी केली जात आहे. मकरसंक्रांतीनंतरही ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे महापालिकेच्या उपद्रव शोधपथकातील अधिकाऱ्यांनी नमूद केले.

वैद्यकीय कचरा जाळणाऱ्या हॉस्पिटलवर 50 हजारांचा दंड
जैव वैद्यकीय कचरा जमा करून व त्याची जाळपोळ करणाऱ्या कामठी रोड इंदोरा येथील श्रीमती निंबुनाबाई तिरपुडे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरवर आशीनगर झोनमधील उपद्रव शोध पथकाने 50 हजारांचा दंड ठोठावला. या हॉस्पिटलवर उपद्रव शोधपथकातील कर्मचाऱ्यांनी पाळत ठेवली होती. घातक कचरा अवैधरित्या व धोकादायकरित्या नष्ट करण्यात येत असल्याचे आढळून आले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ban on plastic kite, Updrav team is active