सावधान...सापासोबत स्टंट केल्यास गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जून 2020

पावसाळ्याच्या हंगामामध्ये साप दिसणे, मानवी वस्त्यांमध्ये, घरांमध्ये साप येणे तसेच सर्प दंशाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात. या परिस्थितीत नागरिक साप पकडण्यासाठी सर्पमित्रांना बोलवीत असतात. सर्पमित्र ही तत्काळ सेवा देऊन साप पकडून सापांचा आणि नागरिकांचा जीव वाचवीत असतात. हे काम कौतुकास्पद आहे. परंतु, काही सर्पमित्र कायद्याचे उल्लंघन करतात आणि साप पकडून कित्येक दिवस आपल्या घरीच ठेवतात. सापांचे प्रदर्शन करतात, सोशल मीडियावर छायाचित्र व व्हिडिओ व्हायरल करीत असतात. हे नियमबाह्य आहे. 

नागपूर, : साप पकडून घरीच बाळगणे, सापांचे प्रदर्शन करणे, सापासोबत स्टंटबाजीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्यास गुन्हा दाखल केला जाणार आहे. काही सर्पमित्र नियमाचे उल्लंघन करीत असे अनुचित प्रकार करीत असतात. अशा प्रकारावर निर्बंघ घालणे आणि दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी सर्पमित्रांनी वनविभागाकडे आपली नोंद करावी, असे आवाहन केले आहे. 

जिल्ह्यात नाग, मण्यार, फुरसे, घोणस, पट्टेरी मण्यार, चापडा हे विषारी साप, तसेच मांजऱ्या, हरणटोळ, अंडीभक्ष्यक साप, फॉस्टेन मांजऱ्या हे निमविषारी साप आणि तस्कर, अजगर, धामण, कुकरी, कवड्या, पट्टेरी कवड्या, पानदिवड, रुखई, गवत्या, धूळ नागीन, नानेटी, वाळा हे बिनविषारी साप अस्तित्वात आहेत.

काहीही होऊ दे पर्यटनाला जाणारच, काय सांगतो हा सर्व्हे...

पावसाळ्याच्या हंगामामध्ये साप दिसणे, मानवी वस्त्यांमध्ये, घरांमध्ये साप येणे तसेच सर्प दंशाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात. या परिस्थितीत नागरिक साप पकडण्यासाठी सर्पमित्रांना बोलवीत असतात. सर्पमित्र ही तत्काळ सेवा देऊन साप पकडून सापांचा आणि नागरिकांचा जीव वाचवीत असतात. हे काम कौतुकास्पद आहे. परंतु, काही सर्पमित्र कायद्याचे उल्लंघन करतात आणि साप पकडून कित्येक दिवस आपल्या घरीच ठेवतात. सापांचे प्रदर्शन करतात, सोशल मीडियावर छायाचित्र व व्हिडिओ व्हायरल करीत असतात. हे नियमबाह्य आहे.

व्यापाऱ्यांची चिनी उत्पादनाविरुद्ध मोहीम 

साप हा वन्यजीव (संरक्षण), अधिनियम 1972 च्या अनुसूचीमध्ये येतात. त्यामुळे सर्पमित्र साप पकडून कित्येक दिवस आपल्या घरी (स्वत:जवळ) बाळगतात, सापांचे प्रदर्शन करतात, फोटो सोशल मीडियावर वायरल करतील त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही केली जाऊ शकते. त्यामुळे सर्पमित्रांनी आपली नोंद वनविभागाकडे करून घेणे आवश्‍यक आहे. यासाठी सर्व सर्पमित्रांनी आधार कार्ड व रहिवासी प्रमाणपत्रासह सेमिनरी हिल्स, नागपूर येथील ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर येथे उपस्थित होऊन आपल्या नावाची नोंद तत्काळ करून घ्यावी.

सापांच्या बाबतीत कुठलीही तक्रार प्राप्त झाल्यास, सोशल मीडियावर कुठल्याही फोटो/व्हिडिओ निदर्शनास आल्यास किंवा वन्यजीवांच्या बाबतीत कुठलाही अनुचित प्रकार घडत असल्यास, संबंधितांवर वन्यजीव (संरक्षण), अधिनियम 1972 अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे उपवनसंरक्षक डॉ. प्रभूनाथ शुक्‍ल यांनी सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Be Cautious... Don`t do stunt with snake