प्रेयसीच्या मित्राला मारहाण; संबंध ठेवल्याचा राग, जुन्या प्रियकरासह ८ जणांविरुद्ध गुन्हा

अनिल कांबळे
Sunday, 7 February 2021

रूपेशसोबत तरुणीचे प्रेमसंबंध सुरू असतानाही विशाल हा तरुणीसोबत बोलायचा. याबाबत रूपेश याला कळले. शुक्रवारी रात्री साथीदारांसह तो विशाल याच्या घरात घुसला.

नागपूर : प्रेयसीसोबत जुन्या बॉयफ्रेंडच्या भेटी-गाठी वाढल्यामुळे संतप्त झालेल्या नवीन प्रियकराने सात मित्रांसह त्याच्यावर हल्ला केला. त्याला दमदाटी करीत पुन्हा प्रेयसीसोबत बोलल्यास ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना त्रिमूर्तीनगरमधील कॉसमॉस टाऊन येथे शुक्रवारी रात्री घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल मनोहरला बमनोटे (वय २०) असे जखमी युवकाचे नाव आहे. विशाल याच्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी रूपेश चंद्रशेखर राठोड, (वय २१ रा. भारतनगर) त्याचे साथीदार हरीश श्रीवास, चेतन राठोड, आकश चौधरी, हरीष खांडुरे, हिमांशू मेश्राम, प्रज्वल गोंडाणे व सुलभ मरसकोल्हे या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अधिक वाचा - मातृत्व अनुभवण्यापूर्वीच झाला बाळाचा मृत्यू, महिलेचं कृत्य पाहून उपस्थितांचेही पाणावले डोळे

विशाल याचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी दोघांचे संबंध संपुष्टात आले. त्यानंतर तरुणीचे रूपेश याच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. रूपेशसोबत तरुणीचे प्रेमसंबंध सुरू असतानाही विशाल हा तरुणीसोबत बोलायचा. याबाबत रूपेश याला कळले. शुक्रवारी रात्री साथीदारांसह तो विशाल याच्या घरात घुसला.

त्याला मारहाण केली. त्याचा मोबाइल फोडला. चाकूचा धाक दाखवून त्याला ठार मारण्याची धमकी दिली. विशाल याने प्रतापनगर पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून रूपेश, त्याचा भाऊ चेतन व श्रीवासला अटक केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beating a lovers friend Crime against 8 people including old boyfriend

Tags
टॉपिकस
Topic Tags: