भरोसा सेलचा पीडित महिलांना आधार; चार वर्षात ४ हजारावर प्रकरणे निकाली

Bharosa sale giving support to women
Bharosa sale giving support to women

नागपूर  ः पीडित महिलांना एकाच छताखाली समुपदेशन, कायदेविषयक सल्ला, पोलिस मदत, वैद्यकीय सेवा, मानसोपचार तज्ज्ञ, संरक्षण अधिकारी व पुनर्वसनाचा लाभ मिळवून देण्यासाठी शहर पोलिस दलाकडून भरोसा सेल सुरू करण्यात आला. २०१७ ते २०२० पर्यंत भरोसा सेलला एकूण ७ हाजर ४४७ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यातील २ हजार ८५४ प्रकरणांमध्ये समेट घडून आला असून ४ हजार ३८४ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.

भरोसा सेल अंतर्गत सामाजिक संस्थांमार्फत ९ समुपदेशिका कार्यरत आहेत. त्यांच्याकडून ६ हजार ४८३ महिलांचे समुपदेशन करण्यात आली. याशिवाय कायदेशीर मदत, पोलिस मदत, संरक्षण, वैद्यकीय मदत मिळवून देण्यात आली. या सेल अंतर्गत महिला व मुलींच्या छेडखानीचे गुन्हे तसेच अन्य गुन्ह्यांच्या प्रतिबंधासाठी दामिनी पथकही स्थापन करण्यात आले आहे. 

या पथकामार्फत लहान मुला मुलींना गुड टच, बॅड टचची माहिती, सायबर काईम, रक्षा ॲप, अनैतिक मानवी देहव्यापार, अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. चार वर्षांमध्ये एकूण १ हजार १७९ जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात आले. याशिवाय महिलांसाठी हेल्पलाईन क्रमांक १०९९ कार्यान्वित करण्यात आला आहे. 

या क्रमांकावर फोनवरून ७४२ तक्रारी आल्या, या सर्व महिलांना वेळीच मदत मिळवून देण्यात आली. सेलच्या प्रयत्नांमुळे कौटुंबिक कलहाच्या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. या सेलमार्फत अल्पवयीन गुन्हेगारांनाही मदत मिळीवून देण्यासह गुन्हेगारी वृत्तीपासून परावृत्त करण्याचे प्रयत्न केले जातात. २०१८ ते २०२० या तीन वर्षांमध्ये ७७८ गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग होता. त्यांचे वेळोवेळी समुपदेशन करण्यासही त्यांच्यासाठी मनोरंजक उपक्रमांचेही आयोजन करण्यात येते.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com