मोठी बातमी: राणे प्रकरणात अचानक ट्विस्ट.. घटनेला अनैतिक संबंधाची किनार? ही माहिती आली समोर

अनिल कांबळे
Sunday, 23 August 2020

सूत्रांच्या माहितीनुसार, डॉ. सुषमा राणे हिने पती प्रा. धीरज राणे, मुलगा ध्रुव आणि मुलगी लावण्या यांना जेवणातून झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्या. त्यानंतर तिघांनाही ॲनेस्थेसियाचे हायडोज इंजेक्शन्स दिलेत.

नागपूर :  कोराडीतील राणे कुटुंबाच्या आत्महत्या प्रकरणात नव्याने ‘ट्विस्ट’ आला असून अनैतिक संबंधाची किनार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र पोलिसांच्या हाती ठोस पुरावे लागले नसून पोलिस कसून तपास करीत आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, डॉ. सुषमा राणे हिने पती प्रा. धीरज राणे, मुलगा ध्रुव आणि मुलगी लावण्या यांना जेवणातून झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्या. त्यानंतर तिघांनाही ॲनेस्थेसियाचे हायडोज इंजेक्शन्स दिलेत.

हेही वाचा - समाजमन सुन्न! तिघांचेही मृतदेह एकामागे एक अन् नातेवाईक हुंदके देत फोडीत होते हंबरडा

तिघांचाही मृत्यू झाल्यानंतर डॉ. सुषमाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मंगळवारी घडलेल्या राणे कुटुंब आत्महत्या प्रकरणाचे गूढ अद्यापही कायम आहे. पोलिसांनी डॉ. सुषमा आणि पती प्रा. धीरज यांचा मोबाईल सीडीआर काढला. 

त्यामध्ये त्याच्या बहिणीच्या घराजवळ राहणाऱ्या युवतीशी त्याचे अनेकदा मोबाईलवर बोलणे झाल्याचे उघडकीस आले. त्या युवतीला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. तिची कसून चौकशी करण्यात आली. प्रा. धीरजसोबत मोबाईलवर बोलत असल्याचेही युवतीने कबूल केले. त्यामुळे प्रा. धीरजचे त्या युवतीशी अनैतिक संबंध होते काय? याची पडताळणी पोलिस करीत आहेत.

डॉ. सुषमाला करीत होता टॉर्चर

प्रा. धीरज हा पत्नी डॉ. सुषमा हिला गेल्या काही दिवसांपासून टॉर्चर करीत होता. पत्नीचा अतोनात छळ करीत होता, खूप मारहाणही करीत होता, अशी खळबळजनक माहिती सुषमाच्या नातेवाइकांनी पोलिसांना दिली.

वाचा सविस्तर - काय आहे कवडी आणि तिची किंमत? घ्या जाणून

कॉलेजच्या प्राचार्यांची चौकशी

गेल्या दोन महिन्यापासून प्रा. धीरज हे अति प्रमाणात दारू प्यायला लागले होते. त्यांचा स्वभावही बदलला होता. महाविद्यालयातील कामांकडेही दुर्लक्ष करीत होते. त्यांच्या कामात नीटनेटकेपणा राहिला नव्हता, अशी माहिती प्रा. धीरजच्या कॉलेजच्या प्राचार्यांनी दिल्याची चर्चा आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: big twist in Rane Case Police investigating the case