महाआघाडीने दिला एकीचा संदेश तर भाजपचे शक्तिप्रदर्शन; ३१ उमेदवार रिंगणात

BJP and Congress show of strength with leaders
BJP and Congress show of strength with leaders

नागपूर : महापौर संदीप जोशी, काँग्रेसचे ॲड. वंजारी, विदर्भवादी नितीन रोंघे, बसपचे प्रशांत डेकाटे यांच्यासह एकूण ३१ उमेदवारांनी पदवीधर निवडणुकीसाठी आपली दावेदारी दाखल केली. यातून किती उमेदवार माघार घेतात त्यानंतर या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

अभिजित वंजारी यांच्यासोबत उमेदवारी दाखल करतान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासोबत थोरात, ऊर्जा व पालकमंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धन व क्रीडामंत्री सुनील केदार, मदत व पुनर्वसन, ओबीसी खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, राष्ट्रवादीचे नेते रमेश बंग, माजी आमदार मोहन जोशी, आशीष दुवा, काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे आदी नेते यावेळी उपस्थित होते. महाघाडीतील सर्व पक्षाचे प्रतिनिधींनी उपस्थिती राहून एकीचा संदेश दिला.

महापौर संदीप जोशी यांच्यासोबत माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी ऊर्जा व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार विकास महात्‍मे, खासदार अशोक नेते, शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, ग्रामीणचे अध्यक्ष राजीव पोतदार, आमदार कृष्णा खोपडे, माजी आमदार सुधाकर देशमुख, अनिल सोले, माजी मंत्री ॲड. सुलेखा कुंभारे, माजी आमदार मिलिंद माने, अर्चना डेहनकर आदी उपस्थित होते. भाजपच्या नेतमंडळींनी उपस्थित राहून शक्तिप्रदर्शन केले.

विदर्भाच्या मुद्यावर अनुशेषाचे अभ्यासक नितीन रोंघे यांच्यासह शिवाजी सोनसरे, अमित मेश्राम, सी. ए. भुतडा, नितेश कराळे, सुनीता पाटील, संजय नासरे, गोकुलदास पांडे, रामराव चव्हाण, प्रशांत डेकाटे, राहुल वानखडे, धर्मेश फुसाटे, अविनाश तुपकर, अतुलकुमार खोब्रागडे, विनोद राऊत, प्रकाश रामटेके, वीरेंद्र जयस्वाल, किशोर वरभे, शरद जीवतोडे, प्रशांत डवले, संगीता बढे, राजेंद्रकुमार फुले, अजय तायवाडे, संदीप रमेश जोशी, सच्चिदानंद फुलेकर, ॲड. मोहमद शाकीर, अभिजित रवींद्र वंजारी, धर्मेद्र मंडलिक यांनी आपली दावेदारी दाखल केली.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com