
अमरावती इथला कार्यक्रम संपवून उपमुख्यमंत्री अजित पवार हे नागपुरात परत येत असताना शहराच्या सीमेवर असलेल्या वाडी शहरात भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचा ताफा अडवण्यात आला
नागपूर: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या नागपूर आणि विदर्भ दौऱ्यावर आहेत. यादरम्यान आज ते अमरावतीत आढावा घेण्यासाठी गेले होते. यावेळी अमरावतीहून परतताना भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा - नगरसेवकांमधील असंतोष उफाळू नये म्हणून भाजपने वेळ नेली मारून; आता देवेंद्र फडणवीसांनी विचारला जाब
अमरावती इथला कार्यक्रम संपवून उपमुख्यमंत्री अजित पवार हे नागपुरात परत येत असताना शहराच्या सीमेवर असलेल्या वाडी शहरात भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचा ताफा अडवण्यात आला. यावेळी रस्त्यावर कार्यकर्त्यांची एकच गर्दी झाली. अजित पवारांनी गाडी थांबवून आमची मागणी मेनी करावी अशी भाजपच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा होती.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वाढीव वीज बिलासंदर्भातील निवदेन मान्य करावं अशी या भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांची मागणी होती. मात्र अडथळा निर्माण झाल्यानंतरही अजित पवारांची गाडी थांबली नाही. तसंच कार्यकर्त्यांना तसं निवेदनही देण्यात आलं नाही. पोलिसांनी लगेच स्थिती नियंत्रणात आणली.
नक्की वाचा - सूर्यमुखी असणाऱ्यांना शपथविधी पहाटेची वाटते, अजित पवारांची फटकेबाजी
राज्यात वाढीव वीजबिलासंदर्भात वातावरण चांगलंच तापलं आहे. वीजबिल माफ करू असं आश्वासन ऊर्जामंत्री दिलं होतं मात्र त्यानंतर त्यांनी घुमजाव केलं असं भाजपचं म्हणणं आहे. त्यामुळे यासंदर्भात भारतीय जनता पक्ष राज्यभर आंदोलन करत आहे. यामुळेच भाजपच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला.
संपादन - अथर्व महांकाळ