यंदा गणेशमूर्तींच्या विक्रीला बॉडकार्स्ट गृपचा आधार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जून 2020

पारंपरिक प्रकरातील मूर्ती घेण्याकडे नागपुरकरांचा कल आहे. चोखंदळ नागपुरकरांच्या पसंतीस उतरतील अशा आसानावर, चौरंगावर, सिंहासनावर बसलेल्या गणेशमूर्ती, टिळक पगडी घातलेली गणेश मूर्ती, शारदा गणेश प्रकरातील अनेक मूर्ती फेसबूकवर आत्तापासूनच भक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत. 

नागपूर : लाडक्‍या गणरायाच्या आगमनाला तसा बराच अवधी आहे. अद्याप श्रावणही सुरू झालेला नाही. मात्र कोरोनाच्या संकटामुळे दरवर्षी फुलणारी बाजारपेठ यंदा बहरेल का याचा नेम नाही. त्यामुळे पेणच्या गणेश मूर्तीकारांनी आत्तापासूनच ऑनलाईन विक्रीस प्रारंभ केला आहे. विशेष म्हणजे ही ऑनलाईन बुकींग नागपुरकरांनी तयार केलेल्या ब्रॉडकार्स्ट गृपच्या मदतीने सुरू आहे. 

शहरात दरवर्षी मातीची असल्याचे सांगून असंख्य प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती विकल्या जातात. अनेक भक्‍तांना गणेशाची स्थापना झाल्यानंतर अथवा थेट विसर्जन करतेवेळीच आपली फसगत झाल्याचे कळते. त्यामुळे शहरातील अनेकांनी आता पेण येथील मातीच्या गणेशमूर्तींना प्राधान्य देण्यास प्रारंभ केले आहे. त्यामुळे विदर्भासह नागपुरातही गेल्या काही वर्षांपासून शाडूच्या मूर्तींची मागणी वाढली आहे. त्यातही पारंपरिक प्रकरातील मूर्ती घेण्याकडे नागपुरकरांचा कल आहे. चोखंदळ नागपुरकरांच्या पसंतीस उतरतील अशा आसानावर, चौरंगावर, सिंहासनावर बसलेल्या गणेशमूर्ती, टिळक पगडी घातलेली गणेश मूर्ती, शारदा गणेश प्रकरातील अनेक मूर्ती फेसबूकवर आत्तापासूनच भक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत. 

संतापाचा भडका : नागरिकांनी सुरक्षारक्षकाचे फाडले कपडे, कारण...

तशी गोकुळाष्टमी झाल्यावर गणेशोत्सवाची लगबग सुरू होते. गणपतीची मूर्ती बुक करण्यासाठी नागरिकही गोकुळाष्टमीचा मुहूर्त साधतात. मात्र गणेश मूर्तीच्या बुकिंगसाठी यंदा स्टॉलवर लोक गर्दी करतील का ? हा प्रश्‍न आहे. त्यामुळे सोशल मिडियाच्या युगात हा नवीन ट्रेंड झपाट्याने रूजतो आहे. विशेषतः शाडूच्या मूर्तींची उपलब्धता कमी असल्याने त्यांचे बुकिंग लवकर करावे लागते. 

वाचा : 'नासा'ने दखल घेतल्याने जगप्रसिद्ध लोणार सरोवर चर्चेत; काय असावे कारण?

गणेशाची वस्त्रे कोणत्या रंगाची असावीत, हाती शस्त्र असावे का, मुशक कसा व किती मोठा असावा याबद्दलही नागपुरकर चोखंदळ आहे. त्यामुळे मनाजोगती मूर्ती मिळत नाही तोपर्यंत ऑनलाईन मिडियावर नागपुरकर मूर्ती शोधतात. विशेष म्हणजे अशा मूर्तीं मर्यादित आहेत. अनेकदा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना खडे, वेलवेटचे रंग वापरल्यामुळे त्या आकर्षक दिसतात मात्र पूजेसाठी लोक अशा मूर्तींचा स्वीकार करत नाहीत. मागणी, भक्‍तांची आवड आणि मूर्तीची योग्य किंमत ठरली की, गणेशमूर्तीचे बुकींग करण्यासाठी मूर्तीकार थेट फेसबूकचा देखील आसरा घेत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bodcarst Group's support for the sale of Ganeshmurti